Home /News /videsh /

रशियाने मारिओपोलचे रुग्णालय घेतले ताब्यात, 400 जणांना ठेवले ओलीस

रशियाने मारिओपोलचे रुग्णालय घेतले ताब्यात, 400 जणांना ठेवले ओलीस

Ukraine-Russia War

Ukraine-Russia War

रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia War ) युद्ध 21 व्या दिवशीही सुरू असून रशियन सैन्य सातत्याने हल्ले करत आहेत. . युक्रेन आणि रशिया यांच्यात दोन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आजही सुरू राहणार आहे. अशातच, रशियाने मारिओपोलचे रुग्णालय ताब्यात घेतले असून 400 जणांना ओलीस ठेवले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 16 मार्च: रशिया आणि युक्रेनमधील (Ukraine-Russia War ) युद्ध 21 व्या दिवशीही सुरू असून रशियन सैन्य सातत्याने हल्ले करत आहेत. युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांनी मोठी घोषणा करत अमेरिकेचे अध्यक्ष ज्या बायडन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर बंदी घातली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात दोन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आजही सुरू राहणार आहे. अशातच, रशियाने मारिओपोलचे रुग्णालय ताब्यात घेतले असून 400 जणांना ओलीस ठेवले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात दोन दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आजही सुरू राहणार आहे. दोन्ही देशांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत भेटतील. दरम्यान, रशियाने मारियुपोलमधील सर्वात मोठे रुग्णालय ताब्यात घेतले आहे आणि सुमारे 400 लोकांना ओलीस ठेवले आहे. मारियुपोलचे उपमहापौर म्हणाले की रशियन सैन्याने डॉक्टर आणि रुग्णांसह 400 लोकांना ओलीस ठेवले होते आणि त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 21 व्या दिवशीही सुरू असून रशिया युक्रेनच्या शहरांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. या हल्ल्यामुळे अनेक शहरे उध्वंस्त होत आहेत. युद्धात आतापर्यंत 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या अध्यक्षांच्या वरिष्ठ सहाय्यकाचे म्हणणे आहे की संभाव्य तोडग्याबद्दलच्या चर्चेत रशियाने आपली भूमिका नरमाईने घेतली आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे वरिष्ठ उपप्रमुख इहोर झोव्हकोवा म्हणाले की, रशियन आणि युक्रेनियन प्रतिनिधींमधील चर्चा “अधिक रचनात्मक” झाली आहे. ररशियाने आपला सूर बदलला आहे आणि युक्रेनने आत्मसमर्पण करण्याची मागणीदेखील थांबवली असल्याचे झोव्हकोवा यांनी म्हटले आहे. शियाने चर्चेच्या सुरुवातीलाच शरणागतीचा आग्रह धरला होता. युक्रेनच्या प्रतिनिधींना चर्चेनंतर तोडगा निघण्याची काहीशी आशा होती. ते म्हणाले की झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मोठी प्रगती करण्यासाठी भेट होण आवश्यक आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Russia, Russia Ukraine

    पुढील बातम्या