पुतिन यांचा दावा आहे की, मारियुपोल आता त्यांच्या ताब्यात आहे. तर, रशियन सैन्याचं म्हणणं आहे की, त्यांनी लुहान्स्क प्रदेशाचा 80 टक्के भाग ताब्यात घेतला आहे. युक्रेनमध्ये पावलापावलावर मृतदेह विखुरलेले आहेत. इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
युक्रेनच्या नष्ट झालेल्या मारियुपोल शहराबाहेर आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. सिटी कौन्सिलने प्लॅनेट लॅबद्वारे 'सामूहिक कबर' म्हणून वर्णन केलेल्या उपग्रहाची प्रतिमा पोस्ट केली आहे.
45 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद असलेल्या या थडग्यात मारियुपोलच्या किमान 1,000 रहिवाशांचे मृतदेह असतील, असं सांगण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धग्रस्त देशाच्या औद्योगिक केंद्रस्थानावरील नियंत्रणासाठी संघर्ष करू शकतात. कारण, युक्रेनियन अधिकार्यांनी म्हटलंय की, रशियाने मारियुपोल बंदरातून पूर्व युक्रेनकडे आपले लष्करी युनिट हलविण्यास सुरुवात केली आहे.
युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेचे सचिव ओलेक्सी डॅनिलोव्ह म्हणाले की, क्रेमलिनने युक्रेनमधील लढाईसाठी सीरिया आणि लिबियामधून 100,000 हून अधिक सैनिक आणि भाडोत्री सैनिक आणले आहेत. देशात दररोज अधिक सैन्य तैनात केलं जात आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, डॉनबासमधील अनेक शहरं आणि गावं तसंच खार्किव प्रदेशाला बॉम्बस्फोटाचा फटका बसला आहे. हे युक्रेनच्या पूर्व भागातील औद्योगिक क्षेत्र असून क्रेमलिनने नवीन युद्ध केंद्र घोषित केलं आहे.
रशियन सैन्याने 2,000 युक्रेनियन सैनिकांना लक्ष्य केलं आहे, जे अजूनही विशाल अझोव्स्टल प्लांटमध्ये लपले आहेत. "दररोज ते अझोव्स्टलवर अनेक बॉम्बवर्षाव करतात," असं मारियुपोलच्या महापौरांचे सल्लागार पेट्रो अँड्रिशचेन्को म्हणाले. मारामारी, गोळीबार, बॉम्बफेक थांबत नाही.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी सांगितलं की, युद्धात दररोज 60 ते 100 युक्रेनचे सैनिक मरत आहेत. तर, 500 हून अधिक सैनिक जखमी होत आहेत.
मायकोलायव्ह शहरात बुधवारी रशियन सैन्याच्या हल्ल्यात दोन जण ठार तर, दोन जखमी झाले. येथे एक बहुमजली इमारत आणि 4 घरांचे नुकसान झालं आहे.