रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या वर्षभरात युद्ध सुरू आहे. आता पुन्हा एकदा युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ले होत आहेत. यावेळी रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याने युक्रेनमध्ये हाहाकार उडाला आहे. रशियाने ब्लॅक सीवरून युक्रेनवर किमान ६० क्रूज मिसाइल डागली आहेत. आता युक्रेनमध्ये चहूबाजूंना स्फोटांचा आवाज येत आहे.
रशियाने नव्याने बॉम्ब हल्ले सुरू केले असून युक्रेन सातत्याने हवाई हल्ल्याचा अलार्म वाजवत आहे. यावेळी रशियाने युक्रेनच्या तीन प्रमुख शहरांना टार्गेट केलं आहे. रशियाने केलल्या या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा : Mysterious Light : कोलकातामध्ये आकाशात दिसला वेगळाच प्रकाशबिंदू, VIDEO व्हायरल
रशियाने खार्किवमध्ये मुलभूत सुविधा देणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य केलं आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी किमान तीन शहरांमध्ये स्फोट केल्याचं म्हटलं आहे. रशियाने मोठ्या प्रमाणावर मिसाइल हल्ले सुरू केले आहेत. याआधी पूर्ण रशियात युक्रेनमध्ये हवाई हल्ल्याचे अलार्म वाजवण्यात आले आणि लोकांना आपआपल्या घरांमध्ये राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
युक्रेनमधील इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा हल्ला करण्यात आल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राजधानी कीव, दक्षिण क्रीवीय रिह आणि उत्तर पूर्व खार्कीव्ह शहरात स्फोट झाला आहे. देशभरात रशियन मिसाईलचा हल्ल्याचे अलार्म वाजवण्यात आले. यामुळे नागरिकांना घरात सुरक्षित राहता आले. रशियाने ऑक्टोबरपासून असे हल्ले केले आहेत. आता नव्याने केलेल्या हल्ल्यानंतर शहरातील वीज गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news