जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर कोणते पर्याय? भारत सरकारचा सल्ला काय? जाणून घ्या 5 पॉईंटमध्ये

युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर कोणते पर्याय? भारत सरकारचा सल्ला काय? जाणून घ्या 5 पॉईंटमध्ये

युक्रेनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर कोणते पर्याय? भारत सरकारचा सल्ला काय? जाणून घ्या 5 पॉईंटमध्ये

Russia-Ukraine War And Future of Indian Students Studying There: युक्रेनमधून (Ukraine) भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) राबवत आहे. याअंतर्गत आतापर्यंत 5 विशेष विमानांद्वारे 1,156 भारतीयांना तेथून परत आणण्यात आले आहे. सोमवारी 28 फेब्रुवारी रोजी 249 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे एक विशेष विमान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. रोमानियामार्गे युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही 18,000 हून अधिक भारतीय तेथे अडकले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

कीव/नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांची संख्या सुमारे 20,000 आहे. स्वस्त वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी हे युक्रेनला (Indian Students in Ukraine) गेले आहेत. रशिया आणि युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीनंतर काही हजार विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले आहे. मात्र, अजूनही अनेकजण तिथेच अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेही आणले जातील, असे आश्वासन भारत सरकार देत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थिती त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत? चला 5 पॉईंटमध्ये (5-Point Explianer) समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सरकार म्हणाले- ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत सर्वांना परत आणणार युक्रेनमधून (Ukraine) भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार (Indian Govt) ‘ऑपरेशन गंगा’ (Operation Ganga) राबवत आहे. याअंतर्गत आतापर्यंत 5 विशेष विमानांद्वारे 1,156 भारतीयांना तेथून परत आणण्यात आले आहे. सोमवारी 28 फेब्रुवारी रोजी 249 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे एक विशेष विमान दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. रोमानियामार्गे (Romania) युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही 18,000 हून अधिक भारतीय तेथे अडकले आहेत. त्यांच्या संदर्भात, भारत सरकारने एक विशेष निवेदन जारी करून म्हटले आहे की, पूर्व युक्रेनसारख्या (Eastern Ukraine) अनेक भागात रशियन आणि युक्रेनियन सैनिकांमध्ये रस्त्यावर लढाई सुरू आहे. त्यामुळे भारतीयांना तेथून बाहेर काढणे कठीण होत आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी त्यांच्या तळावरच राहावे असा सल्ला दिला जात आहे. भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारचे 4 वरिष्ठ मंत्री या कामावर देखरेख आणि समन्वय साधत आहेत. अशी परिस्थिती यापूर्वी आली आहे का? 2014 साली रशियाने युक्रेनच्या क्रिमियावर आक्रमण केल्यावर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. ते ताब्यात घेतले होते. त्यानंतर क्रिमियाच्या 3 वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर संकट उभे राहिले. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी इतर विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला. आणखी काहींनी रशियातील संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता. अनेकांची अन्य संस्थांमध्ये बदली केली. रशियाने दिली ISS खाली पाडण्याची धमकी! अमेरिका झुकेल का? जाणून घ्या 5 पॉईंटमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसमोर कोणते पर्याय आहेत? तज्ञांच्या मते, दोन पर्याय आहेत. पहिला, तुम्ही युक्रेनमध्ये (Ukraine) ज्या संस्थेत शिकत आहात त्या संस्थेत शिकत राहा. काही महिने ऑनलाइन, मग परिस्थिती सामान्य झाल्यावर तिथे नियमित जाता येईल. दुसरा पर्याय म्हणजे त्यांना शेजारील देशातील संस्थेत अॅडमीशन स्थानांतरित करणे. तिथे नावनोंदणी करा. किर्गिझस्तान, कझाकस्तान, उझबेकिस्तान इत्यादी देशांतील शैक्षणिक संस्था सल्लागारांच्या मदतीने पर्याय असू शकतात. तेथील शिक्षण आणि फीची परिस्थिती युक्रेनसारखीच आहे. आता दिलेल्या फीचे काय होणार? ही फार मोठी समस्या नाही, कारण युक्रेनमध्ये भारतीय संस्थांच्या तुलनेत फी खूपच कमी आहे. दुसरे म्हणजे - ही फी देखील एकरकमी घेतली जात नाही. सेमिस्टरनुसार, म्हणजेच तुम्ही जसेजसे पुढे शिक्षण घेता तशी फी जमा करत राहा. अशा प्रकारे, एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी प्रथम वर्षासाठी 6-8 लाख रुपये शुल्क आकारले जाते. पुढच्या वर्षीपासून तेही कमी होते. सध्या तेथून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे हे पहिले प्राधान्य असून भारत सरकार स्वखर्चाने हे काम करत आहे. 4 मार्चला सकाळी 7:59 वाजता सावधान राहा! पृथ्वीच्या जवळून जाणार मोठा लघुग्रह युद्धानंतर तुम्ही युक्रेनमध्ये अभ्यास सुरू ठेवण्याची किती शक्यता आहे? हे येत्या 2 महिन्यात कळेल. मे-जूनमध्ये युक्रेनच्या संस्थांमध्ये सुट्ट्या आहेत. त्यावेळी सर्व विद्यार्थी आपापल्या देशात परत जातात. म्हणजेच सध्या विशेष त्रासाची बाब नाही. त्यानंतर तेथे सप्टेंबरपासूनच नवीन शैक्षणिक सत्र सुरू होते. तोपर्यंत युद्धाचे ढग विरून जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर युक्रेनमध्ये अभ्यास सुरू ठेवता येईल की इतरत्र नावनोंदणी करणे चांगले होईल याचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात