मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनचा ढोंगीपणा! सीमावादावर भारतासोबत 'गोड शब्द', तिकडे तिबेट-झिनजियांगमध्ये उभारतायेत रस्त्यांचे जाळं

चीनचा ढोंगीपणा! सीमावादावर भारतासोबत 'गोड शब्द', तिकडे तिबेट-झिनजियांगमध्ये उभारतायेत रस्त्यांचे जाळं

India-china Border dispute: एलएसीवर भारतासोबतच्या सीमावादाच्या दरम्यान चीन तिबेट (Tibet) आणि शिनजियांग (Xinjiang) प्रांतात नवीन विमानतळ आणि हेलिपॅड बांधत आहे. त्यांना सहज पोहोचता यावे यासाठी रेल्वे लाईन आणि रस्त्यांचे जाळेही टाकले जात आहे. या पायाभूत सुविधा अशा पद्धतीने तयार केल्या जात आहेत की, गरज पडल्यास त्यांचा लष्करी कामांसाठीही वापर करता येईल. या विमानतळांवर चिनी हवाई दल (Chines airforce) तैनात राहिल्यास भारताविरोधात चांगली हवाईशक्ती मिळेल, असे एका शोधनिबंधात म्हटले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

ल्हासा, 27 मार्च : चीन (China) भारतासोबतचा सीमावाद सोडवण्याचं (border dispute) ढोंग करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. कारण, चीन सीमाभागात लष्करी पायाभूत सुविधा मजबूत (upgrading military infrastructure) करण्यात व्यस्त आहे. या अंतर्गत ते तिबेट (Tibet) आणि शिनजियांग (Xinjiang) प्रांतात नवीन विमानतळ आणि हेलिपॅड (Airports & helipads)बांधत आहेत. त्यांना सहज पोहोचता यावे यासाठी रेल्वे लाईन आणि रस्त्यांचे जाळेही टाकले जात आहे. चीनच्या मुख्य औद्योगिक क्षेत्रापासून दूर असलेल्या या भागात या पायाभूत सुविधा अशा प्रकारे तयार केल्या जात आहेत की, गरज पडल्यास त्यांचा लष्करासाठीही वापर करता येईल.

चीन तिबेटमध्ये चार नवीन विमानतळ बांधत असल्याच्या बातम्या एएनआय या वृत्तसंस्थेने तिबेटच्या प्रसारमाध्यमांचा हवाला देत दिल्या आहे. यापैकी तीन- लुंत्से विमानतळ, गारी-बुरंग विमानतळ आणि शिगात्से टिंगरी विमानतळ भारत-चीन सीमेपासून फक्त 60 किमी अंतरावर आहेत. हे विमानतळ अशा ठिकाणी निवडकपणे बांधले जात आहेत, जिथे अद्याप चिनी सैन्यासाठी हवाई सुविधा नाहीत. चायना पॉवर (China Power) नावाच्या एका शोधनिबंधात असे म्हटले आहे की, जर चीनचे हवाई दल या विमानतळांवर तैनात असेल तर त्यांना भारताविरोधात चांगली हवाई शक्ती मिळेल.

शिनजियांगमधील 15 विमानतळ अपग्रेड

तिबेटप्रमाणेच चीननेही आपल्या विवादित शिनजियांग प्रांतात गेल्या पाच वर्षांत 15 विमानतळांचे अपग्रेडेशन केले आहे. यापैकी 7 सामान्य नागरिकांसह लष्कराच्या वापरासाठी योग्य करण्यात आले आहेत. शोधनिबंधानुसार, यापैकी एक होटन विमानतळ भारत आणि चीनमधील वास्तविक नियंत्रण रेषेपासून (LAC) 240 किमी अंतरावर आहे. चीन या विमानतळाच्या मुख्य भागापासून अवघ्या 5 किमी अंतरावर जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रेही तैनात करत आहे.

India Vs China | चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याने सीमावाद निवळणार का?

रोड, रेल्वे, नेटवर्कचे जाळे

या भागांमध्ये लष्कराची पोहोच वाढवण्यासाठी विमानतळांव्यतिरिक्त चीन रेल्वे आणि रस्त्यांचे जाळेही विणत आहे. सरकारी आकडेवारी दर्शवते की 2015 ते 2020 दरम्यान, तिबेटमधील महामार्गांचे जाळे 7840 किमीवरून 11820 किमीपर्यंत वाढले आहे. हे चीनच्या इतर कोणत्याही प्रांत आणि क्षेत्रापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे, शिनजियांगमधील महामार्गांची लांबी देखील 2015 मध्ये 17830 किमी वरून 2020 मध्ये 20920 किमी पर्यंत वाढविण्यात आली आहे.

11 देशांच्या सीमा त्यांना लागून आहेत

तिबेट आणि शिनजियांगचे क्षेत्र चीनसाठी महत्त्वाचे आहेत कारण ते 11 देशांच्या सीमेवर आहेत. यापैकी बहुतेक देश असे आहेत ज्यांचा चीनसोबत छत्तीसचा आकडा आहे. हे चीनच्या प्राचीन सिल्क रूट क्षेत्रात येतात, ज्याचा युरोपमधून व्यवसाय वाढवण्यासाठी ते पुन्हा तयार करत आहेत. चीन आपल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) कार्यक्रमांतर्गत येथे अनेक पायाभूत सुविधा उभारत आहे. याशिवाय चीनने ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि कझाकिस्तानसोबतही सुरक्षा सहकार्य वाढवले ​​आहे.

First published:

Tags: India china