मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia-Ukraine War: युक्रेनमधल्या भारतीयांचं लवकरच Airlift..!राबवणार स्पेशल ऑपरेशन, विमानांचाही खर्च उचलणार मोदी सरकार

Russia-Ukraine War: युक्रेनमधल्या भारतीयांचं लवकरच Airlift..!राबवणार स्पेशल ऑपरेशन, विमानांचाही खर्च उचलणार मोदी सरकार

Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या CCS बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या CCS बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Russia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या CCS बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

    नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: युक्रेनच्या युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीयांना (Indians) परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवलं जाणार आहे. शेजारील देशांतून भारतीय नागरिकांचे आगमन झाल्यानंतर विशेष उड्डाणे चालवली जातील. सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी उड्डाणांचा खर्च फक्त केंद्र सरकार (Central Government) उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या CCS बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणण्याची योजना तयार आहे. जर तुम्हाला युक्रेन ते पोलंडला रस्त्यानं जायचं असेल तर तो 9 तासांचा मार्ग आहे आणि व्हिएन्नापर्यंत 12 तासांचा मार्ग आहे, तो मार्ग देखील मॅप आऊटकरण्यात आला आहे. ल्विव्ह, चेर्नित्सि या मार्गावर मी नमूद केलेल्या मुद्द्यांवर आम्ही आमची टीमही पाठवली आहे जेणेकरून आम्ही तिथून आमच्या नागरिकांना जी काही मदत करू शकतो ती देऊ शकू, असं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितलं होतं. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा Emotional Video..! म्हणाले,'मी आणि माझी पत्नी...' युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यात तेथील अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची पथके युक्रेनलगतच्या हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाक रिपब्लिक या देशांमध्ये पाठविली जाणार आहेत. युक्रेनमधील नागरिकांनी या पथकांमधील व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे. युक्रेनला लागून असलेल्या 4 देशांतून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. हे देश हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाक रिपब्लिक आणि पोलंड आहेत. या देशांच्या सीमेवर भारतीय दूतावासानं छावण्या उभारल्या आहेत. या शिबिरांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ज्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे त्यांची नावे आणि क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. भारतीय विद्यार्थी रस्त्यानं या देशांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना कतारमार्गे भारतात आणलं जाईल. यासाठी दोहा येथील भारतीय दूतावासानं सर्व तयारी केली आहे. भारतातील कुटुंबांची दयनीय अवस्था रशियानं युक्रेनवर हल्ला केला तेव्हा भारतातून मेडिकल शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. परिस्थिती बिघडायला लागल्यावर नातेवाइकांची अवस्था दयनीय झाली आणि तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचाही विश्वास डळमळू लागला. सर्व कुटुंबियांची एकच विनंती आहे की भारत सरकारनं आमच्या मुलांना मायदेशी परत आणावं. युक्रेनमध्ये सायकलस्वारावर तोफगोळा पडतानाचा थेट Live Video युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार विद्यार्थी वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकले आहेत.सर्वांच्या कुटुंबीयांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची चिंता आहे. तिथे अडकलेली मुलंही परत येण्याच्या आशेने सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. हरियाणातील यमुनानगरमध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांच्या पालकांनीही शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन मुलांना सुखरूप परत आणण्याची विनंती केली. शिक्षणमंत्री कंवरपाल गुजर यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Narendra modi, Russia Ukraine

    पुढील बातम्या