मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Russia Ukraine Conflict: रशिया-युक्रेन वादात अमेरिकेचा Action Mode, बायडेन यांनी जारी केले कठोर निर्बंध

Russia Ukraine Conflict: रशिया-युक्रेन वादात अमेरिकेचा Action Mode, बायडेन यांनी जारी केले कठोर निर्बंध

Russia Ukraine Conflict: युक्रेन-रशिया वाद (Ukraine-Russia dispute) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.

Russia Ukraine Conflict: युक्रेन-रशिया वाद (Ukraine-Russia dispute) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.

Russia Ukraine Conflict: युक्रेन-रशिया वाद (Ukraine-Russia dispute) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.

न्यूयॉर्क,23 फेब्रुवारी: युक्रेन-रशिया वाद (Ukraine-Russia dispute) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील दोन प्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (US President Joe Biden) यांनी राष्ट्राला संबोधित केलं. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आम्ही परिस्थितीचे आकलन करत असून या परिस्थितीचे आकलन करून आम्ही पावले उचलणार आहोत, असं म्हटलं आहे.

आमच्या बाजूने संरक्षणात्मक पावले उचलली जात असल्याचं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं आहे. रशियाच्या दोन वित्तीय संस्थांवर निर्बंधांची घोषणा करताना बायडेन यांनी म्हटलं आहे की, रशिया पाश्चात्य देशांसोबत अधिक व्यापार करू शकणार नाही. आम्हाला अनेक पावले उचलावी लागणार आहेत. तसंच पाश्चात्य देशांकडून रशियाला मिळणारी मदतही बंद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रशियाकडून सातत्यानं आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केलं जात आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियन सैन्य तैनात आहेत.

गेल्या दोन दिवसांत आमच्या अनेक बैठका झाल्या, असंही बायडेन म्हणाले. रशियाशी युद्ध करण्याचा आमचा हेतू नाही. रशियानं युक्रेनला चारही बाजूंनी घेरलं आहे. रशियाच्या पुढील वाटचालीकडे आमचं लक्ष लागलं आहे. जो बाडेन म्हणाले की, आम्ही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी सतत चर्चा करत आहोत. रशिया आणि युक्रेनमधील वाद सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी वाद सोडवण्याचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.

युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू राहील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, आम्ही काही काळापासून सतत परिस्थितीचे आकलन करत आहोत आणि परिस्थिती लक्षात घेऊन पावले उचलणार आहोत. आम्ही नाटो आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरूच ठेवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

अमेरिका म्हणाली - हा रशियाचा अमेरिकेत नवा हल्ला

त्याच वेळी अमेरिकेचे मुख्य उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फिनर म्हणाले की, आम्हाला वाटते की ही हल्ल्याची सुरुवात आहे. कारण युक्रेनमध्ये रशियाचा हा नवा हल्ला आहे. हा केवळ हल्ला असून ही रशियाची चाल असल्याचं त्यांनी सांगितलं.

बायडेन प्रशासनाने सैन्याच्या तैनातीला केला विरोध

अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसने युक्रेनमधील रशियाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात असंही म्हटले आहे की, बायडेन प्रशासनाने यापूर्वी पुतिन यांच्या सैन्य तैनात करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.

व्हाईट हाऊसचं रशियाच्या हालचालींवर लक्ष

अधिकाऱ्यानं सांगितलं की, व्हाईट हाऊसला हे पाहायचे आहे की रशिया प्रत्यक्षात काय करणार आहे. अधिकाऱ्यानं म्हटलं की, रशियन सैन्याच्या हालचालींचं मूल्यांकन केल्यानंतर हे स्पष्ट झालं की हा रशियाचा नवीन प्रकार आहे.

First published:
top videos

    Tags: Joe biden, President Vladimir Putin, Russia Ukraine