मराठी बातम्या /बातम्या /विदेश /थोडक्यात बचावले वाल्दिमिर पुतिन, ताफा अडवून हल्ल्याचा प्लान फेल!

थोडक्यात बचावले वाल्दिमिर पुतिन, ताफा अडवून हल्ल्याचा प्लान फेल!

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन जीवघेण्या हल्ल्यातून बचावले

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन जीवघेण्या हल्ल्यातून बचावले

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, सुदैवाने पुतिन पूर्णपणे सुरक्षित आहेत. पुतिन त्यांच्या घराजवळ असतानाच त्यांच्या ताफ्याचा रस्ता अडवण्यात आला आणि हा हल्ला करण्यात आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मॉस्को, 15 सप्टेंबर : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, सुदैवाने पुतिन पूर्णपणे सुरक्षित आहेत. पुतिन त्यांच्या घराजवळ असतानाच त्यांच्या ताफ्याचा रस्ता अडवण्यात आला आणि हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली आहे. तसंच पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

पुतिन यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2017 साली पुतिन यांनी आपल्यावर पाच जीवघेणे हल्ले झाल्याची माहिती दिली होती.

युरोविकलीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रपती पुतिन यांच्या कारचं डाव्या बाजूचं चाक एका गोष्टीला जाऊन धडकलं. पुतिन त्यांच्या घरापासून काही किमी अंतरावरच होते, तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एका कारचा मार्ग एम्ब्युलन्सने अडवला. तर अचानक आलेल्या अडथळ्यामुळे दुसऱ्या कारचा रस्ताही भरकटला.

रशियाच्या मीडियावर कडक सरकारी नियंत्रण असल्यामुळे पुतिन यांच्यावर हा हल्ला नेमका कधी झाला, याची पूर्णपणे माहिती मिळाली नाही. हल्ल्याच्या शक्यता वाढल्यामुळे पुतिन डिकॉय मोटरकेडमधून प्रवास करत असल्याचं वृत्तही युरोविकलीने दिलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुतिन यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अनेक जवानांचं आणि अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे, तर काहींना अटकही करण्यात आली आहे, कारण राष्ट्रपतींच्या मुव्हमेंटबाबत खूपच कमी जणांना माहिती असते.

मोदी-पुतिन भेट

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन हे समरकंदच्या यात्रेवर जात आहेत. इकडे ते शांघाय सहयोग संघटना (SCO) च्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत पुतिन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचीही भेट घेणार आहेत.

First published:
top videos

    Tags: President Vladimir Putin