Home /News /videsh /

Russia-Ukraine War: युद्ध आणखी भडकणार! रशियाने भाड्याने घेतले 20 हजार सैनिक, काय आहे कारण?

Russia-Ukraine War: युद्ध आणखी भडकणार! रशियाने भाड्याने घेतले 20 हजार सैनिक, काय आहे कारण?

russia-ukraine-war

russia-ukraine-war

रशियाने युक्रेनच्या डोनबास भागात सुमारे 20 हजार भाड्याने घेतलेले सैनिक तैनात केले आहेत. रशियन कंपनी द वॅगनर ग्रुपने या भाडोत्री सैनिकांना कामावर घेतलं आहे.

    नवी दिल्ली 22 एप्रिल : रशियाने युक्रेनविरोधात युद्ध (Russia Ukraine War) पुकारून 50 दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही जगातील सर्वात मोठ्या शक्तींपैकी एक असलेल्या रशियाला युक्रेनला झुकवता आलेलं नाही. या कामासाठी रशियाने आता भाड्याने घेतलेल्या लढाऊ सैनिकांना कामाला लावलं आहे (Russia hired Fighters). रशिया युक्रेन युद्धात जर्मनीचा बळीचा बकरा बनत आहे का? वाचा पडद्यामागच्या गोष्टी रशियाने युक्रेनमधील लढा अधिक तीव्र केला आहे. याअंतर्गत आता रशियानेही युक्रेनमध्ये भाड्याचे सैनिक तैनात करण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनचे वृत्तपत्र द गार्डियनच्या वृत्तानुसार, रशियाने युक्रेनमध्ये लढण्यासाठी सीरिया, लिबिया आणि इतर देशांतून भाड्याने घेतलेले सैनिक पाठवले आहेत. वृत्तपत्रानुसार, रशियाने युक्रेनच्या डोनबास भागात सुमारे 20 हजार भाड्याने घेतलेले सैनिक तैनात केले आहेत. रशियन कंपनी द वॅगनर ग्रुपने या भाडोत्री सैनिकांना कामावर घेतलं आहे. त्यांच्या रँकनुसार त्यांना दरमहा $600 ते $3000 मजुरी म्हणून दिली जात आहे. आता प्रश्न असा पडतो की, या लढाऊंना युक्रेनमध्ये तैनात करण्यामागे रशियाचा हेतू काय? या प्रश्नाचं उत्तर देताना संरक्षण तज्ज्ञ शैलेंद्र सिंह म्हणाले की, जेव्हा अशा भाडोत्री सैनिकांना युद्धात आणलं जातं तेव्हा युद्धातील क्रूरता आणखी वाढते. युक्रेनमधील लोकांवरील क्रूरता आणि अत्याचार वाढवणं हाही रशियाचा उद्देश आहे. यामुळे, युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध असणारी गलिच्छ आणि अनैतिक कृत्ये त्यांना स्वतःला करावी लागणार नाहीत. रशियातील युद्धसामग्रीचे सॅटेलाइट फोटो व्हायरल! गुगलला ब्लर फोटोंवर द्यावं लागलं स्पष्टीकरण दुसरा प्रश्न असा पडतो की जगातील सर्वात मोठं सैन्य असलेल्या देशांच्या यादीत सामील असलेल्या रशियाला भाड्याने घेतलेल्या लढाऊ सैनिकांची काय गरज होती? या संदर्भात संरक्षण तज्ञ शैलेंद्र सिंह म्हणतात की रशियाला आपल्या सैनिकांना मृत्यूच्या कचाट्यात जाण्यापासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्याची गरज होती. भाड्याने घेतलेले सैनिक हे असे सैनिक आहेत जे लढत असलेल्या दोन सैन्यांपैकी कोणाचेही सदस्य नाहीत. ते त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी कोणत्याही एका सैन्याच्या वतीने लढा देतात. संरक्षण तज्ञ शैलेंद्र सिंह यांनी सांगितलं की, 'भाड्याने घेतलेले सैनिक युद्धात लढण्यासाठी पैसे घेतात. जिंकण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते अतिशय निर्दयी असतात.'
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Russia Ukraine, War

    पुढील बातम्या