मॉस्को, 25 जून : रशियात खासगी सैन्य वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन याने बंडखोरीची घोषणा केली होती. यामुळे रशियात गृहयुद्धाची आणि सत्ताबदलाची स्थिती निर्माण झाली होती. असं काही घडू नये यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जबरदस्त हालचाली केली. मात्र तरीही देशात अराजकतेचं वातावऱण झालं. पण आता रशियन सरकार आणि प्रिगोझिन यांच्यात बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी मध्यस्थी केली. अलेक्झांडर लुकाशंको यांच्याद्वारे करण्यात आलेल्या करारानुसार आता प्रिगोझिन रशिया सोडून बेलारूसला जातील. अल जजिराने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी सांगितलं की, लुकाशेंकोने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या परवानगीने मध्यस्थीसाठी हालचाली केल्या होत्या. लुकाशेंको आणि प्रिगोझिन हे 20 वर्षांपासून एकमेकांना वैयक्तिक ओळखतात. प्रिगोझिन यांनी म्हटलं की, आमच्या सैन्याला आदेश दिला आहे की, रक्तपात होऊ नये त्यामुळे मॉस्कोच्या दिशेने जाण्याऐवजी आपआपल्या ठिकाणी परत या. इजिप्तच्या तरुणीने PM MODI यांचं केलं ‘शोले’स्टाईल स्वागत; पाहून पंतप्रधानही भारावले न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी शनिवारी सांगितलं की, येवगेने प्रिगोझिन यांनी बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या मध्यस्थीनंतर आपल्या लष्कराला थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सशस्त्र नेतृत्व करणाऱ्या वॅगनर नेत्याविरोधात लावण्यात आलेले सर्व आरोप मागे घेतले जात आहेत. दिमित्री पेसकोव्ह म्हणाले की, प्रिगोझिन बेलारुसला जाणार आहेत. त्यांच्यासोबत विद्रोह करणाऱ्या लष्करावरही कोणताच खटला चालवला जाणार नाही. बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, प्रिगोझिन यांच्यासोबत तणाव कमी करण्याच्या करारावर चर्चा सुरू आहे. बेलारूसच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, आज रात्री ९ वाजता राष्ट्रपतींनी फोनवरून चर्चा केली. बेलारूसच्या राष्ट्रपती लुकाशेंको यांनी वॅगनर प्रमुखाशी बोलणं झाल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सांगितले. याबद्दल पुतीन यांनी लुकाशेंको यांचे आभारही मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.