जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय व्यक्ती बसणार; मॉर्डंट यांची माघार

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय व्यक्ती बसणार; मॉर्डंट यांची माघार

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय व्यक्ती बसणार; मॉर्डंट यांची माघार

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय व्यक्ती बसणार; मॉर्डंट यांची माघार

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लंडन, 24 ऑक्टोबर : इतिहासात पहिल्यांदा भारतीय वंशाचा व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. ऋषी सुनक यांची सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. सुनक यांना 190 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. त्याच वेळी, त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंट 100 खासदारांचा आवश्यक पाठिंबा मिळवण्यात अपयशी ठरल्याने शर्यतीतून बाहेर पडल्या. पेनी मॉर्डंट यांनी ट्विटमध्ये जाहीर केले की त्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत आहे आणि यूकेचे पंतप्रधान म्हणून सुनक यांना पाठिंबा देत आहे. सुनक हे ब्रिटनचे 57 वे पंतप्रधान असतील. देशाचे नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती असतील. ते ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान देखील आहेत. मात्र, देशाचे अर्थमंत्री असताना ते क्वचितच आपल्या धर्माबद्दल बोलले.

जाहिरात

ऋषी सुनक यांचे भारताबरोबरच पाकिस्तानशीही नाते सुनक यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटीश-शासित भारतात झाला होता. मात्र, त्यांचे जन्मस्थान पाकिस्तानच्या आधुनिक पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे आहे. अशा प्रकारे नवीन पंतप्रधान भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही आहे. क्वीन लायन्स 86 या ट्विटर हँडलने ट्विट केले की, ‘सनक गुजरांवाला यांचे पंजाबी खत्री कुटुंब आहे, जे आता पाकिस्तानमध्ये आहे. ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी 1935 मध्ये नैरोबीमध्ये लिपिकाच्या नोकरीसाठी गुजरांवाला सोडले. वाचा - UK Crisis : पंतप्रधानपदाचा राजीनामा देणाऱ्या लिझ ट्रस यांना मिळणार कोट्यवधी रुपये, कारण… कौटुंबिक माहिती देणार्‍या क्वीन लायन्स 86 नुसार, रामदास यांची पत्नी, सुहाग राणी सुनक, 1937 मध्ये केनियाला जाण्यापूर्वी गुजरांवाला येथून त्यांच्या सासूसोबत दिल्लीला गेल्या होत्या. ऋषी यांचा जन्म 1980 मध्ये साउथम्प्टनमध्ये झाला.

News18लोकमत
News18लोकमत

सर्वप्रथम बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला, त्यानंतर निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस खुर्चीवर बसल्या. मात्र, त्यांनाही फार काळ सत्ता मिळाली नाही आणि 45 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक या शर्यतीत सामील झाले आणि यावेळी त्यांना विजय मिळाला. ऋषी सुनक यांचा भारतासाठी हा विजय दिवाळीच्या भेटीपेक्षा कमी नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: britain
  • First Published :
जाहिरात
जाहिरात