मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'डेटला येण्यापूर्वी वाचून ये'; तरुणीने बॉयफ्रेंडला दिला 17 पानी रिलेशनशीप कॉन्ट्रॅक्ट

'डेटला येण्यापूर्वी वाचून ये'; तरुणीने बॉयफ्रेंडला दिला 17 पानी रिलेशनशीप कॉन्ट्रॅक्ट

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

नुकत्याच एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वी मागण्यांची मोठी यादी (Demand of Girlfriend) सोपवली आहे.

असं म्हणतात जोड्या (Relationship) आधीच तयार असतात. मात्र आजकाल तर नात्यांचा कराराप्रमाणे (Contract) स्वीकार केला जात आहे. नुकत्याच एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला रिलेशनशीपमध्ये येण्यापूर्वी मागण्यांची मोठी यादी (Demand of Girlfriend) सोपवली आहे. ही अशी तशी यादी नाही तर हा रिलेशनशीप करार  (Relationship Contract) आहे. हा करार दोघांमध्ये नातं बांधणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे प्रकरण?

21 वर्षीय एनी राइट (Annie Wright) काही काळ एका टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये (Toxic Relationship) होती. मात्र यातून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या नात्यात जाण्यासाठी ती घाबरत होती. यादरम्यान गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ती 23 वर्षीय माइकल हेड (Michael Head) याला टिंडरवर भेटली. मायकलसोबत तिचं नातं गेल्या काही नात्यांपेक्षा चांगलं जावं अशी तिथी इच्छा होती. यासाठी तिने 17 पानांचा रिलेशनशीप कॉन्ट्ॅक्ट माइकलला दिला. या लांब करारात एनीने अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. यातील एक करारानुसार, जेव्हा हे दोघे डेटवर बाहेर जातील तेव्हा मायकल याचे पैसे देईल. महिन्यातील दोन वेळा तिला फूल गिफ्ट करावं आणि आठवड्यात 5 वेळा वर्कआऊट करावं.

हे ही वाचा-नोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनलीय करोडपती

एनीने सांगितलं की, त्या दोघांनी ठरवलं आहे की ते आपल्या नात्यात करार ठेवतील. रिस्क मॅनेजमेंटची विद्यार्थिनी एनी आणि लॉ स्टुडेंट मायकलने रिलेशनशीपसाठी स्वत:चे नियम तयार केले आहेत. एनीने सांगितलं की, त्यांचं नातं एका बिझनेस मीटिंगप्रमाणे असेल. बिजनेसमध्ये ज्या पद्धतीने अडचणी सोडविल्या जातात, येथेही तशाच प्रकारे समस्या सोडवल्या जातील. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे दोघे कधीच एकमेकांना दोष देणार नाहीत. कोणत्याची समस्येसाठी 50 टक्के जबाबदारी एनीची तर 50 टक्के मायकलची असू शकते. कोणा एकाच मुळे समस्या उद्भवू शकत नाही. ते वर्षाच्या शेवटी एक वार्षिक बैठकीचं आयोजन करतात. यामध्ये गेलं वर्षं कसं गेलं याबद्दल चर्चा केली जाते. यानंतर ते नात्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Love story