मराठी बातम्या /बातम्या /विदेश /नोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनली करोडपती

नोकरी सोडून तिनं कचऱ्याचा व्यवसाय केला सुरू, आता बनली करोडपती

कचऱ्याचा व्यवसाय करून करोडपती झालेली ही महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या कामाचे व्हिडिओ शेअर करत राहते.

कचऱ्याचा व्यवसाय करून करोडपती झालेली ही महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या कामाचे व्हिडिओ शेअर करत राहते.

कचऱ्याचा व्यवसाय करून करोडपती झालेली ही महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या कामाचे व्हिडिओ शेअर करत राहते.

मुंबई,  10 सप्टेंबर : कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं, असं नेहमीच म्हटलं जातं. शिवाय वेगळा विचार करून नवा मार्ग चोखाळणाऱ्यासाठी आकाशाचीही सीमा नसल्याचं अनेकदा सिद्ध झालंय. अशा एका महिलेनं सर्वांना आश्चर्यात पाडणारा निर्णय घेत चक्क नोकरी सोडून कचऱ्याच्या व्यवसायाला (Waste business) सुरुवात केली. अनेकांनी तिला वेड्यात काढलं. तिला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा निर्णय पक्का होता. आता ही महिला करोडपती बनली असून तिची ही कहाणीही इन्स्टाग्रामवर हिट झाली आहे.

या महिलेचं नाव टिफनी असून ती अमेरिकेतल्या टेक्सासची आहे. टिफनीसाठी, इतरांचा कचरा हा तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. जेव्हा 32 वर्षीय टिफनीला कळलं की, ती कचरा विकून श्रीमंत होऊ शकते, तेव्हा तिनं यावर काम सुरू केलं आणि कचरा विकायला सुरुवात केली. कचऱ्याचा व्यवसाय करून करोडपती झालेली ही महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ती इन्स्टाग्रामवर तिच्या कामाचे व्हिडिओ शेअर करत राहते.

टिफनीनं 2016 मध्ये हा निर्णय घेतला. हळूहळू तिनं इतके पैसे कमवायला सुरुवात केली की, दर आठवड्याला सुमारे 1000 डॉलर्स (73 हजार रुपये) तिच्या बचतीत जमा होऊ लागले. टिफनीनं 2020 मध्ये ती चालवत असलेलं तिचं कॅन्टीनही बंद केलं आणि आता तिनं कचऱ्याच्या व्यवसायावर (Waste business) पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय.

हे वाचा - महिला सरपंचाची संपत्ती तब्बल 19 कोटींची, आलिशान स्वीमिंग पूल आहे बंगल्यात! तपासाधिकारीही पडले चाट

एवढंच नाही तर, टिफनीचा पतीही तिच्यासोबत याच व्यवसायात उतरला आहे. टिफनी चार मुलांची आई आहे. तिचे सोशल मीडियावर जवळपास 20 लाख फॉलोअर्स आहेत. टिफनीच्या कचरा जमवण्याची सुरुवात एका व्हिडिओने झाली होती. तिनं काही कचरा उचलणाऱ्या मुलींचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पाहिला होता. त्यानंतर तिनं हे काम करून पाहिलं आणि जेव्हा नफा मिळायला सुरुवात झाली, तेव्हा तिनं याच कामाला आपला व्यवसाय बनवलं.

हे वाचा - एकुलत्या एका मुलाने केली आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

टिफनीचा 38 वर्षीय पती डॅनियल टिफनीच्या कामावर खूप खूश आहे. कारण या कामामुळे पर्यावरणाचीदेखील आपोआप काळजी घेतली जाते. टिफनी म्हणते की, कचरा गोळा करताना मला बेडशीट, उशा, ब्लँकेट अशा लहान-सहान वस्तूही मिळतात. ती म्हणते, मी या व्यवसायावर खूश आहे. आता ती सतत तिच्या कामाची छायाचित्रे आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

First published:
top videos

    Tags: Inspiring story, Woman