मराठी बातम्या /बातम्या /विदेश /50 रुपयांच्या नाण्याची तब्बल 19 हजार रुपयांना विक्री, कारण आहे बहुमोल

50 रुपयांच्या नाण्याची तब्बल 19 हजार रुपयांना विक्री, कारण आहे बहुमोल

नाण्याची किंमत 50 रुपये पण विकलं गेलं 19 हजार रुपयांना. हे नेमकं कसं घडलं? वाचा सविस्तर

नाण्याची किंमत 50 रुपये पण विकलं गेलं 19 हजार रुपयांना. हे नेमकं कसं घडलं? वाचा सविस्तर

नाण्याची किंमत 50 रुपये पण विकलं गेलं 19 हजार रुपयांना. हे नेमकं कसं घडलं? वाचा सविस्तर

लंडन, 21 डिसेंबर: 50 रुपयांच्या एका नाण्यासाठी (50 panes coin) तब्बल 19 हजार रुपयांची (sold for 19 thousand) बोली लागल्याची घटना समोर आली आहे. एखाद्या नाण्याचं किती महत्त्व (Rare and historic coin) असू शकतं आणि दुर्मिळ नाणी जवळ बाळगण्यासाठी लोक कशा प्रकारे पैसे खर्च करू शकतात, याचं उदाहरणच या घटनेतून समोर आली आहे. युकेतील केव गार्डनचं हे नाणं असून त्याची मूळ किंमत आहे 50 रुपये.

असा आहे इतिहास

50 रुपये मूळ किंमत असलेलं हे नाण त्याच्या किंमतीच्या तब्बल 300 पट जास्त रकमेला विकलं गेलं आहे. केव गार्डनकडून 2009 साली हे नाणं बाजारात आणलं गेलं होतं. वास्तविक, युनायडेट किंगडममध्ये 1759 साली रॉयल बॉटनिकल गार्डनची स्थापना केली होती. त्याच्या स्थापनेला 250 वर्षं पूर्ण होण्याच्या आनंदाप्रित्यर्थ या नाण्याचं अनावरण करण्यात आलं होतं. हे नाणं सर्वसामान्य माणसांपासून गर्भश्रीमंतांपर्यंत अनेकांच्या पसंतीला उतरलं होतं. हे नाणं आपल्याकडे असावं, यासाठी प्रत्येकजण अधिकाधिक पैसे देऊन ते विकत घेत होता.

लागली 19 हजारांची बोली

नुकतीच eBay वर या नाण्याची बोली लावण्यात आली होती. त्यात या नाण्याला 19 हजार रुपयांची सर्वोच्च बोली लागली. या प्रकारची 10 हजार नाणी 2009 साली बाजारात आणण्यात आली होती. मात्र ती नाणी सध्या विक्रीसाठी उपलब्ध नसून आपल्या संग्रहातून विकायला लोक तयार नसल्याचं त्यातून दिसून येत आहे.

हे वाचा-पाकिस्तानात हिंदू मंदिरात तोडफोड, दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

काय आहे खासियत

या नाण्याच्या पाठिमागच्या बाजूला प्रसिद्ध चायनीज पॅगोडाचा फोटो लावण्यात आला आहे, तर क्वीन एलिजाबेथ द्वितीय यांची प्रतिमा पुढच्या बाजूला लावण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा हे नाणं विक्रीसाठी बाजारात येतं, तेव्हा तेव्हा त्याला सर्वोच्च बोली लागत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

First published:
top videos

    Tags: Britain, Money, Price