नवी दिल्ली, 8 सप्टेंबर : Britain Queen Elizabeth: ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची तब्येत जास्तच बिघडल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. एलिझाबेथ यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. क्वीन एलिझाबेथ या एपिसोडिक मोबिलिटी त्रासाने ग्रस्त आहे. बकिंगम पॅलेसकडून जारी केलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी दिलेल्या सल्लानुसार महाराणी एलिथाबेथ त्यांच्या देखरेखीखाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी (Queen Elizabeth II) 21 एप्रिल 2022 रोजी वयाची 96 वर्षं पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलिप (Duke of Edinburgh, Prince Philip) यांचा मृत्यू झाला होता. प्रिन्स फिलिप यांचं त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या केवळ काही आठवडे आधी निधन झालं होतं. बातमी अपडेट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.