मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अभिमानास्पद! अमेरिकच्या सर्जन जनरलपदी डॉ. विवेक मूर्ती यांची नियुक्ती, जो बायडेन यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

अभिमानास्पद! अमेरिकच्या सर्जन जनरलपदी डॉ. विवेक मूर्ती यांची नियुक्ती, जो बायडेन यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

जो बायडेन यांची राष्ट्राध्यक्ष (President) म्हणून निवड झाल्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर अनेक बदल होत आहेत. अनेक महत्त्वांच्या पदावर नवीन व्यक्तींची नेमणूक होत असून, विशेष म्हणजे यात भारतीय व्यक्तींची संख्या अधिक आहे.

जो बायडेन यांची राष्ट्राध्यक्ष (President) म्हणून निवड झाल्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर अनेक बदल होत आहेत. अनेक महत्त्वांच्या पदावर नवीन व्यक्तींची नेमणूक होत असून, विशेष म्हणजे यात भारतीय व्यक्तींची संख्या अधिक आहे.

जो बायडेन यांची राष्ट्राध्यक्ष (President) म्हणून निवड झाल्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर अनेक बदल होत आहेत. अनेक महत्त्वांच्या पदावर नवीन व्यक्तींची नेमणूक होत असून, विशेष म्हणजे यात भारतीय व्यक्तींची संख्या अधिक आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Meenal Gangurde
वॉशिंग्टन, 10 डिसेंबर : अमेरिकेचे (USA) नियोजित अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी सर्जन जनरल (Surgeon General) या महत्त्वाच्या पदावर मूळ भारतीय वंशाचे डॉ. विवेक मूर्ती (Dr. Vivek Murthy) यांची नियुक्ती केली आहे. या आधीही त्यांनी या पदावर काम केले आहे. जो बायडेन यांची राष्ट्राध्यक्ष (President) म्हणून निवड झाल्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर अनेक बदल होत आहेत. अनेक महत्त्वांच्या पदावर नवीन व्यक्तींची नेमणूक होत असून, विशेष म्हणजे यात भारतीय व्यक्तींची संख्या अधिक आहे. बराक ओबामा यांच्या कार्यकाळातही सर्जन जनरल पदावर या पूर्वी बराक ओबामा (Barak Obama) यांच्या अध्यक्षीय कार्यकाळातही डॉ. मूर्ती अमेरिकेचे सर्जन जनरल होते. या पदावर सर्वांत तरुण वयात येण्याचा मान डॉ. मूर्ती यांना मिळाला होता. त्या वेळी बायडेन उपराष्ट्राध्यक्ष होते. आरोग्यसेवा विभागाचे सचिव झेव्हियर बेसेरा बायडेन यांच्या आरोग्याची जबाबदारी घेणार आहेत. यावेळी कठीण जबाबदारी – सध्या अमेरिकेतील कोविड 19 चे मोठे संकट आहे. ते आव्हान पेलण्याची मोठी जबाबदारी डॉ. विवेक मूर्ती यांच्यावर आहे. त्यामुळं मूर्ती ही जबाबदारी कशी पार पाडतात यावर अमेरिकेचेच नव्हे तर सगळ्या जगाचे लक्ष असणार आहे. याबाबतीत ते नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांच्या  सर्वात महत्त्वाच्या सल्लागारांपैकी एक असतील. असा होता डॉ. मूर्ती यांचा शैक्षणिक प्रवास - मूर्ती यांचे कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील; पण त्यांचे डॉक्टर असलेले आई-वडील मूर्ती यांच्या जन्माआधी ब्रिटनला स्थलांतरित झाले. तिथं यॉर्कशायर भागातल्या हडर्सफिल्ड इथं 10 जुलै  1977 मध्ये डॉ. विवेक मूर्ती यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचे डॉक्टर आई वडील अमेरिकेतील मियामी इथं वास्तव्याला आले. मियामी इथं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठात पदवी आणि येल स्कूल ऑफ मेडिसीनमधून एमडी ही पदव्युत्तर पदवी मिळविली. नंतर त्यांनी व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळवली असली, तरी वैद्यकीय सेवेवरच भर दिला. विशेष अनुभव आणि योगदान – डॉ. विवेक मूर्ती यांना फिजिशियन म्हणून दोन दशकांच्या अनुभवासह संशोधक आणि सार्वजनिक आरोग्य सेवेत व्हाईस अॅडमिरलपदावरील कामाचा अनुभव आहे. 1995 मध्ये त्यांनी आपली बहीण रश्मी यांच्याबरोबर त्यांनी भारत आणि अमेरिकेत एड्सबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या व्हिजन्स (VISIONS) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली होती. 1997 मध्ये ग्रामीण भारतातील महिलांना आरोग्य कर्मचारी म्हणून प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचेही ते सहसंस्थापक होते. बराक ओबामा यांच्या काळात महत्वाच्या सर्जन जनरलपदाची जबाबदारी पार पाडणाऱ्या डॉ. मूर्ती यांनी 2008 मध्ये ओबामा यांच्या समर्थनार्थ ‘डॉक्टर्स फॉर अमेरिका’ या संघटनेची स्थापना केली. यामध्ये 16 हजार फिजिशियन आणि अमेरिकेतील सर्व राज्यांमधील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वांसाठी किफायतशीर दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. गेल्या दशकातील कार्य – 2011मध्ये डॉ. मूर्ती आरोग्य सेवा सल्लगार समूहाचे सदस्य म्हणून निवडले गेले. त्यानंतर त्यांनी 2014 ते 2017 या काळात अमेरिकेचे सर्जन जनरल म्हणून काम पाहिले. ड्रग्ज, दारू या व्यसनांपासून लोकांनी दूर राहावं, आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करावी यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. लहान मुलांच्या लसीकरणासाठीही त्यांनी विशेष काम केलं. निवडणुकीच्या आधी बायडेन यांच्या ‘कोविड 19’ साथीचा मुकाबला करण्यासाठीच्या सल्लागार गटातील तीन प्रमुख सल्ल्गारांपैकी एक डॉ. मूर्ती होते. कोविड 19 च्या (Covid 19) संकटाचा सामना करण्यसाठी केवळ लॉकडाउन उपयोगी नाही, हा अंतिम पर्याय आहे, असे डॉ. मूर्ती यांचे मत आहे. देशाला आता अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्या दिशेनं जोरदारप्रयत्न करण्याची गरज आहे, असंही डॉ. मूर्ती यांचं म्हणणं आहे. सर्जन जनरल पदी आपली निवड होणं हे अनपेक्षित होत. पण ही एक संधी आहे, असं आपण मानतो, असंही डॉ. मूर्ती यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: India america, Joe biden, US elections

पुढील बातम्या