• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • क्रूरतेची हद्द, म्यानमार सत्तापालटाविरोधातील आंदोलकांवर सैन्याचा गोळीबार, 70 जण ठार

क्रूरतेची हद्द, म्यानमार सत्तापालटाविरोधातील आंदोलकांवर सैन्याचा गोळीबार, 70 जण ठार

म्यानमारमधील सैन्यानं (Military Coup) थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात आतापर्यंत 70 प्रदर्शनकर्त्यांचा मृत्यू (Protesters Killed In Firing) झाल्याची बातमी समोर आली आहे.

 • Share this:
  यंगून 15 मार्च : म्यानमारमधील सत्ता पालटल्यानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी यंगून परिसरात प्रदर्शनकर्त्यांनी एका चिनी फॅक्टरीमध्ये आग लावली. यानंतर म्यानमारमधील सैन्यानं (Military Coup) थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात आतापर्यंत 70 प्रदर्शनकर्त्यांचा मृत्यू (Protesters Killed In Firing) झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनातील ही घटना सर्वाधिक भयानक ठरली. यंगूनमधील गोळीबारात 51 लोकांचे जीव गेले. तर, इतर वेगवेगळ्या शहरांतील 19 लोकांनीही रविवारी आपला जीव गमावला. म्यानमारमधील एका संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत प्रदर्शनादरम्यान 125 जणांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमध्ये एक फेब्रुवारीला सैन्यानं सत्ता पालट केला. सैन्याच्या मालकीच्या असलेल्या मयावाडी टीव्हीनं देशाच्या घटनेच्या 417 व्या कलमाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत सैन्याला सत्ता आपल्या हातात घेण्याची परवानगी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की कोरोनाचं संकट आणि नोव्हेंबरमध्ये निवडणूक घेण्यात अपयशी ठरलेलं सरकार हीच आपात्कालीन परिस्थितीची कारणं आहेत. म्यानमारचे लोकशाही सरकार कोणताही कायदा आणू शकतो, परंतु तो लागू करण्याची ताकद सेना प्रमुखांकडे आहे यादरम्यान, नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीचे वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी जनतेसोबत संवाद साधला. फेसबुकच्या माध्यमातून साधलेल्या या संवादात त्यांनी, सध्याचा काळ हा सर्वात काळा काळ असल्याचं त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले, की हा या गोष्टीचा संकेत आहे, की लवकरच नवी पहाट येणार आहे. यादरम्यान सत्ता पालटाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आपलं समर्थन असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. दुसरीकडे, मध्य म्यानमारमध्ये स्थित मोनवा टाउनशिपने आपले स्थानिक शासन आणि पोलीस दल तयार करण्याची घोषणा केली आहे. सत्ता पालटानंतर 80 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे तर 2100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: