मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! तुरुंगात असलेल्या प्रियकराला भेटायला गेली तरुणी; KISS करताच कैद्याचा मृत्यू

Shocking! तुरुंगात असलेल्या प्रियकराला भेटायला गेली तरुणी; KISS करताच कैद्याचा मृत्यू

एका महिलेला तुरुंगात असलेल्या तिच्या प्रियकराला भेटायला गेल्यानंतर त्याचं चुंबन (kiss) घेणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिने किस केल्यामुळे तिच्या प्रियकराचा मृत्यू (died) झाला आहे.

एका महिलेला तुरुंगात असलेल्या तिच्या प्रियकराला भेटायला गेल्यानंतर त्याचं चुंबन (kiss) घेणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिने किस केल्यामुळे तिच्या प्रियकराचा मृत्यू (died) झाला आहे.

एका महिलेला तुरुंगात असलेल्या तिच्या प्रियकराला भेटायला गेल्यानंतर त्याचं चुंबन (kiss) घेणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिने किस केल्यामुळे तिच्या प्रियकराचा मृत्यू (died) झाला आहे.

  मुंबई 19 ऑगस्ट : जगात अशा अनेक घटना (incidents) घडत असतात ज्या ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. कोणाच्या आयुष्यात कधी, कुठे आणि काय घडेल याचा अंदाजच बांधता येत नाही. असाच काहीसा प्रकार अमेरिका येथील टेनसी  येथे घडलाय. येथे एका महिलेला तुरुंगात असलेल्या तिच्या प्रियकराला भेटायला गेल्यानंतर त्याचं चुंबन घेणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण तिने किस केल्यामुळे तिच्या प्रियकराचा मृत्यू झाला आहे.

  अमेरिकेतील टेनसी येथे घडलेली एक घटना समोर आली असून ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तुरुंगात असलेल्या प्रियकराला भेटायला गेलेल्या प्रेयसीने त्याला किस करताच प्रियकराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली. खरं तर, प्रेयसीने प्रियकराला देण्यासाठी ड्रग्ज आणली होती. ही ड्रग्ज तोंडात ठेऊन किस करण्याच्या बहाण्याने प्रेयसी प्रियकराला ड्रग्ज देणार होती. त्यामध्ये ती यशस्वी झाली, पण ही सर्व ड्रग्ज एकाचवेळी त्याने गिळली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली.

  चोरी करण्यासाठी विमानानं प्रवास, 100 घरं साफ करणाऱ्या महिलेची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले

  नेमकं काय घडलं ?

  टेनसी तुरुंगात जोशुआ ब्राउन हा एका गुन्ह्यात अटकेत आहे. त्याला भेटण्यासाठी त्याची प्रेयसी रेचल डोलार्ड गेली होती. यावेळी भेटल्याच्या आनंदात रेचलने ब्राउनला किस केलं, आणि त्यानंतर काहीवेळाने ब्राउनचा मृत्यू झाला. तपासात जे समोर आलं ते अतिशय धक्कादायक होतं. ब्राउनला भेटण्यासाठी आलेल्या रेचलच्या तोंडात

  मेथॅम्फेटामाइन (Methamphetamine) हे ड्रग्ज होतं. रेचल 'किस' करताना हे ड्रग जोशुआच्या तोंडात टाकणार होती. असं करण्यात ती यशस्वीही झाली, पण नेमकं येथेच गडबड झाली. तोंडातून तिने तब्बल महिनाभराचा ड्रग्जचा साठा ब्राउनला दिला होता, तो त्याने चुकून एकाचवेळी गिळला आणि त्याचा मृत्यू झाला.

  यवतमाळमध्ये शिक्षिकेवर तरुणाचा हल्ला, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?

  म्हणून झाला मृत्यू

  ड्रगच्या ओव्हरडोसमुळे ब्राउनचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. खरं तर, रेचलने किस करताना त्याच्या तोंडात करताना सुमारे 14 ग्रॅम ड्रग ट्रान्सफर केलं होतं. पण चुकून त्याने एकाचवेळी हे संपूर्ण ड्रग गिळलं, हेच त्याच्या मृत्यूचं कारण बनलं. तरुणाच्या मृत्यूनंतर आता संबंधित महिलेवर खुनाचा आरोप ठेवून तिला अटक करण्यात आली आहे. जोशुआ ब्राउन ड्रग्ज प्रकरणात 11 वर्षांची शिक्षा भोगत होता. त्याच्या मृत्यूनंतर, टेनसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शनच्या एजंटने रेचल डोलार्डला ताब्यात घेतलं आणि तिला अंमली पदार्थांची तस्करी आणि खुनाचा आरोपाखाली अटक केली. दरम्यान, याअगोदर फेब्रुवारीमध्येही रेचलने ब्राउनला भेटण्याच्या बहाण्याने ड्रग दिल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Prisoners