जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 'माझ्यासोबत चंद्रावर चला', जपानी अब्जाधीशानं दिलं मोफत प्रवासाचं निमंत्रण!

'माझ्यासोबत चंद्रावर चला', जपानी अब्जाधीशानं दिलं मोफत प्रवासाचं निमंत्रण!

'माझ्यासोबत चंद्रावर चला', जपानी अब्जाधीशानं दिलं मोफत प्रवासाचं निमंत्रण!

जपान (Japan) मधील अब्जाधीश युसाकू माएजावा (Yusaku Maezawa) यांनी चंद्रावर जाण्याची इच्छा असलेल्या सामान्य व्यक्तींसाठी एक गुड न्यूज दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च:  पृथ्वीच्या बाहेरच्या विश्वाची नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. त्यामुळे 1969 साली अमेरिकेन अंतराळवीरांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले, तो दिवस संपूर्ण जगात आजही साजरा केला जातो. अमेरिकेनंतर अनेक देशांनी चांद्रमोहिमा केल्या. मात्र अजून कोणताही सामान्य व्यक्तीला पर्यटनासाठी किंवा इच्छा आहे, म्हणून चंद्रावर गेलेला नाही. जपान (Japan) मधील अब्जाधीश युसाकू माएजावा (Yusaku Maezawa) यांनी चंद्रावर जाण्याची इच्छा असलेल्या सामान्य व्यक्तींसाठी एक गुड न्यूज दिली आहे. माएजावा यांनी चंद्रावर पर्यटनासाठी जाण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.  या ट्रिपमध्ये त्यांच्यासोबत  जाण्यासाठी त्यांना जगभरातील आठ जण हवे आहेत. आपल्याला जगातील सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीचे आठ लोक हवे आहेत, अशी घोषणा माएजावा यांनी ट्विटरवरुन (Twitter) केली आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या सर्व व्यक्तींचा खर्च देखील माएजावा स्वत: करणार आहेत. मायजेवा यांनी या मिशनला ‘डियर मुन’ (Dear Moon) असं नाव दिलं असून 2023 साली त्यांचं खासगी यान चंद्राच्या प्रवासासाठी उड्डाण करणे अपेक्षित आहे. Watch this video to learn more about the selection process. It also contains a special message from @elonmusk #dearMoon ↓Check the full version https://t.co/i3ucR6BB44 pic.twitter.com/B3d8g0JvvP — Yusaku Maezawa (MZ) (@yousuckMZ) March 2, 2021 दोन अटींची पूर्तता आवश्यक चंद्रावर जाण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींनी दोन अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे.  व्यक्तीला त्याच्या क्षेत्रामध्ये प्राविण्य हवे. तसंच अन्य लोकांच्या आणि समाजाच्या मदतीसाठी तो कायम तयार हवा, ही पहिली अट आहे. त्याचबरोबर या प्रकारची इच्छा असलेल्या अन्य व्यक्तींना त्याने मदत करावी अशी दुसरी अट माएजावा यांनी ठेवली आहे.  या प्रवासासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांनी एक विशेष लिंक सुरु केली असून त्या ठिकाणी अर्ज करण्याची सोय  उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (हे वाचा :  खराब संत्र्यांमुळे उजळली स्पेनमधील घरे; वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग यशस्वी ) कोण आहेत माएजवा? माएजावा हे जपानच्या फॅशन उद्योगातील एक मोठं नाव आहे. त्यांनी एलन मस्क (Elon Musk) यांच्या Space X या प्रोजेक्टमध्येही नाव नोंदवलं आहे. त्यांनी यापूर्वी चंद्रावर जाण्यासाठी गर्लफ्रेंडचा शोध सुरु केला होता.यामध्ये त्यांना 2 हजार अर्ज आले होते, नंतर त्यांनी तो विचार रद्द केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात