लंडन, 16 जानेवारी: ब्रिटीश सरकारनं (British Government) आपल्या कुटुंबाला (Family) पोलीस संरक्षण (Police protection) घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राजपुत्र हॅरी (Prince Harry) यांनी लंडनच्या कोर्टात (Court) केली आहे. आपण पैसे भरून पोलिसांचं संरक्षण घेण्यासाठी तयार आहोत, मात्र ब्रिटीश सरकार आपल्याला अशी परवानगी देत नाही. त्यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला पुरेशी सुरक्षा मिळणं हा मूलभूत अधिकार असून तो मिळावा, या मागणीसाठी आता न्यायालयीन लढा लढला जाणार आहे. काय आहे प्रकरण?ब्रिटीश राजपुत्र हॅरी हे त्यांच्या कुटुंबासह सध्या अमेरिकेत राहतात. ते जोपर्यंत ब्रिटनमध्ये राहत होते, तोपर्यंत त्यांना पोलिसांचं संरक्षण होतं. मात्र 2020 साली प्रिन्स हॅरी आणि त्याच्या पत्नीनं ब्रिटन सोडून अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घटनेतील तरतुदीनुसार मिळणारं ब्रिटनमधील संरक्षण काढून घेण्यात आलं होतं. तर अमेरिकेत या कुटुंबानं खासगी सुरक्षा घेतली होती. राजपुत्र येतोय परतदरम्यान, प्रिन्स हॅरीला मुलगी झाली आणि ती आता 7 महिन्यांची झाली आहे. प्रिन्स हॅरी पत्नी आणि लेकीसह आपल्या आईला म्हणजेच ब्रिटनच्या राणीला भेटण्यासाठी येणार आहे. या काळात आपल्याला ब्रिटीश पोलिसांचं संरक्षण मिळावं, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. या संरक्षणासाठी जो काही खर्च लागेल, तो उचलण्याची तयारीदेखील प्रिन्स हॅरी यांनी दाखवली होती. मात्र ब्रिटीश सरकारनं या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटन सोडल्यामुळे इथल्या पोलिसांचं संरक्षण घेण्याचा अधिकार त्यांनी गमावला असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
हे वाचा -
खासगी विरुद्ध सरकारी सुरक्षाआपल्याला खासगी सुरक्षा घेणं शक्य असलं तरी ती सरकारी पोलिसांच्या सुरक्षेइतकी अभेद्य असून शकत नाही. त्यामुळे आपल्याला सरकारी पोलिसांचंच संरक्षण पाहिजे, या भूमिकेवर प्रिन्स हॅरी ठाम आहे. असं संरक्षण मिळाल्याखेरीज आपण ब्रिटनमध्ये परतणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता कोर्टात या प्रकरणाचा काय निकाल लागतो, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.