Home /News /videsh /

युक्रेनवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत मोठी बातमी, Microsoftनं केला खुलासा

युक्रेनवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत मोठी बातमी, Microsoftनं केला खुलासा

युक्रेनवर झालेला सायबर हल्ला हा रँसमवेअरला असावा, असा संशय आतापर्यंत व्यक्त होत होता. मात्र आता हा हल्ला मालवेअरचाच असल्याचं मायक्रोसॉफ्टनं स्पष्ट केलं आहे.

    युक्रेन, 16 जानेवारी: युक्रेनवर (Ukraine) झालेला सायबर हल्ला (Cyber Attack) हा मालवेअरचाच (Malware) असल्याचा खुलासा मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) केला आहे. युक्रेनमधील जवळपास 70 सरकारी वेबसाईटवर (70 government websites) हा सायबर झाला हल्ला झाला असून गेल्या काही दिवसांपासून देशातील राज्यकारभार पूर्णतः ठप्प झाला आहे. आतापर्यंत युक्रेनच्या सरकारी वेबसाईटवर झालेला हल्ला हा रँसमवेअरचा असावा, असं मानलं जात होतं. मात्र आता हा हल्ला मालवेअरचाच असल्याचं सांगण्यात आलं आहे.  काय आहे फरक? मालवेअर हा असा व्हायरल असतो, तो एखादी सिस्टिम पूर्णतः डॅमेज करून टाकतो. या व्हायरसची निर्मिती हीच मुळात एखादी सिस्टिम उद्धस्त करण्यासाठी झालेली असते. या व्हायरसचा हल्ला रोखण्यात यश आलं नाही, तर तो वेबसाईट आणि कॉम्प्युटर यांची कधीही न भरून येणारी हानी करतो. रँसमवेअर मात्र खंडणीच्या उद्दशाने तयार करण्यात आलेला असतो. हा व्हायरस वेबसाईट किंवा कॉम्प्युटर यांचा एक्सेस बंद करतो आणि त्याच्या बदल्यात पैशांची किंवा खंडणीची मागणी करतो. ती पूर्ण झाल्यावर ऍक्सेस पुन्हा देण्यात येतो.  जनतेचे होतायत हाल युक्रेनमधील जवळपास सर्व सरकारी वेबसाईट बंद झाल्यामुळे राज्यकारभार ठप्प झाला आहे. दैनंदिन जीवनासाठी गरजेच्या असणाऱ्या अनेक मूलभूत गरजांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. वीज गायब झाल्यामुळे अनेक कार्यालयं ठप्प झाली आहेत.  हे वाचा - रशियावर संशय या हल्ल्यामागे रशियाचा हात असावा, असा संशय युक्रेननं व्यक्त केला आहे. दुसरीकडे अमेरिकेनंही रशियाकडेच बोट दाखवत युक्रेनमध्ये अशांतता निर्माण कऱण्यात कुणाला रस असू शकतो, असा प्रश्न विचारला आहे. तर रशियाने आपल्याला युक्रेनमध्ये आणि त्यांच्या राज्यकारभारात काहीही रस नसल्यानं स्पष्ट करत हात वर केले आहेत. मात्र हा हल्ला कसा परतवून लावायचा आणि यंत्रणा पूर्ववत कशी करायची, याचं उत्तर अजूनही युक्रेनला मिळालेलं नाही.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Cyber crime, Russia, Ukraine news, Virus

    पुढील बातम्या