मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

एका विकृतामुळे उडालीय पूर्ण शहरात खळबळ, दुकानातील खाद्यपदार्थांत टोचलं स्वतःच्या रक्ताचं इजेक्शन

एका विकृतामुळे उडालीय पूर्ण शहरात खळबळ, दुकानातील खाद्यपदार्थांत टोचलं स्वतःच्या रक्ताचं इजेक्शन

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सुपर मार्केटमध्ये (Super Market) घुसून तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये (Food packets) स्वतःच्या रक्ताचं इंजेक्शन (Injection of blood) घुसवणाऱ्या माथेफिरुला पोलिसांनी अटक (arrested) केली आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 27 ऑगस्ट : सुपर मार्केटमध्ये (Super Market) घुसून तिथल्या खाद्यपदार्थांमध्ये (Food packets) स्वतःच्या रक्ताचं इंजेक्शन (Injection of blood) घुसवणाऱ्या माथेफिरुचा पोलीस शोध घेत आहेत. दुकानात शिरण्यापूर्वी त्यानं काही सीरिंजमध्ये स्वतःचं रक्त भरून घेतलं आणि दुकानात जाऊन खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये ते घुसवलं, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या माथेफिरूच्या कृत्यामुळे आता पश्चिम लंडन भागातील अनेक दुकान बंद ठेवण्यात आलं असून नेमक्या कुठल्या पदार्थांमध्ये त्यानं स्वतःचं रक्त मिसळलं, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

अशी उघड झाली घटना

ही घटना आहे पश्चिम लंडनमधील. हॅमरस्मिथ भागात एक 38 वर्षांचे टॉम हॅरिंगटन सकाळच्या वेळी रस्त्यावरून जॉगिंग करत चालले होते. त्यावेळी तिशीतील या तरुणाने त्यांच्या मागोमाग धावत त्यांना चिडवायला सुरुवात केली. ‘रन फॅट बॉय रन’ असं म्हणत तो काही काळ टॉम यांच्यासोबत धावत राहिला. त्यानंतर त्याने एक सीरिंज काढून टॉम यांच्याकडे फेकली. दोघांमध्ये अंतर असल्यामुळे ही सीरिंज टॉम यांना न लागता त्यांच्या पायापाशी पडली. या प्रकारानंतर टॉम यांना धक्का बसला. या तरुणाकडे सीरिंजनी भरलेले एक बॉक्स होता आणि त्यात अनेक सिरिंज होत्या, असं टॉम यांनी सांगितलं.

टॉम यांनी दिली माहिती

रक्ताची सीरिंज आपल्याकडे फेकल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यानंतर त्यांनी तरुणाचा शोध घेतला. पोलीस तपासात हा तरुण एका सुपर मार्केटमधून आल्याचं निष्पन्न झालं. त्या ठिकाणीदेखील मांस आणि इतर खाद्यपदार्थ ठेवलेल्या पॅकेट्समध्ये त्याने स्वतःच्या रक्ताचं इंजेक्शन दिल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर हे दुकान बंद ठेवण्यात आलं असून तिथले खाद्यपदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. नेमक्या कुठल्या पदार्थांमध्ये आणि काय इन्फेक्शन झालंय, याचा शोध घेतला जात आहे. किमान 3 ते 4 वेगवेगळ्या सुपर मार्केंटमध्ये हा आरोपी गेल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा - मोठी दुर्घटना: कारवर कोसळलं हेलिकॉप्टर; थरारक घटनेचा VIDEO आला समोर

माथेफिरू आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या सुपरमार्केटव्यतिरिक्त इतर ठिकाणी हा तरुण गेला होता का, याचादेखील शोध घेतला जात आहे. हॅमरस्मिथ आणि फुलहम प्रशासनानं सध्या आपातकालीन अलर्ट जाहीर केला असून दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.

First published:

Tags: Crime, Injection, London