लंडन, 18 जून : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अवैध स्थलांतरितांविरोधातील मोहिमेअंतर्गत टाकण्यात आलेल्या छाप्यावेळी हे फोटो काढले आहेत. ब्रिटनमध्ये अवैध पद्धतीने घुसखोरी करणाऱ्यांविरोधात देशव्यापी मोहिम उघडण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत गृहविभागाच्या अधिकाऱ्यांकडून देशात अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे स्वत: या छाप्यावेळी उपस्थित होते. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी गृह विभागाने 105 जणांना अटक केलीय. बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या ऋषी सुनक यांनी उत्तर लंडनच्या ब्रेंटमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात सहभाग घेतला होता. आठवड्याच्या सुरुवातीला ते मोहिमेत सहभागी झाले होते. पुढच्या निवडणुकी आधी ब्रिटनमधील अवैधरित्या घुसखोरी केलेल्या स्थलांतरीतांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. या कारवाईला ब्रिटन सरकारने प्राधान्य दिलं आहे. Earthquake News: चाललंय काय? जम्मू काश्मीर हादरलं, 24 तासात 5 वेळा भूकंप ब्रिटनचे गृहमंत्री सुएल्ला ब्रावेरमॅन यांनी सांगितलं की, अवैध कामगारांमुळे आमच्या नागरिकांचे नुकसान होत आहे. यात प्रामाणिक कामगार बेरोजगार राहत आहेत आणि लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण अवैधरित्या घुसखोरी करणारे कर भरत नाहीत. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की आपण आपल्या कायद्याचा आणि सीमेचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला माहिती आहे की रोजगारात काळाबाजार हा ब्रिटनसाठी धोक्याचा आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही. गुरुवारी पूर्ण ब्रिटनमध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये अधिकाऱ्यांनी 159 संशयित ठिकाणांवर छापा टाकला. तिथे अनधिकृतपणे काम करणाऱ्या 105 परदेशी नागरिकांना अटक केली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे काम करणाऱ्या संशयितांना रेस्टॉरंट, कार वॉश, नेल बार, फॅसिलिटी स्टोअर्स इत्यादी ठिकाणांहून अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली. पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही ट्विटरवरून याची माहिती दिली. ते म्हणाले की, गुरुवारी मी अवैध कामगारांवर छापा टाकण्याच्या मोहिमेत सहभागी झालो. देशात कुणी यायचं हे देशच ठरवे. गुन्हेगार इथे येऊ शकत नाहीत. हे काम अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांना रोखण्याचं माझं आश्वासन पूर्ण करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचं असल्याचंही सुनक म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.