न्यूयॉर्क, 21 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांची भेट टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी घेतली. यानंतर एलॉन मस्क यांनी सांगितलं की, टेस्लाला भारतात जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यावेळी न्यूयॉर्कमध्ये एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. भारतात टेस्लाच्या गुंतवणुकीबाबत विचारले असता एलॉन मस्क यांनी सांगितले की, मला विश्वास आहे की, टेस्ला भारतात लवकरच येईल. मी पंतप्रधान मोदींच्या पाठिंब्यासाठी आभारी आहे आणि आशा आहे की, भविष्यात लवकरच काही घोषणा आम्ही करू. मस्क यांनी म्हटलं की, मी मोदींचा मोठा चाहता आहे आणि पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियात टेस्लाच्या कारखान्याला भेट दिली होती. भारताच्या भविष्याबद्दल उत्साही आहे. भारतात जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत अधिक शक्यता, संधी आहेत. पंतप्रधान मोदी भारताची काळजी करतात कारण ते आम्हाला भारतात गुंतवणुकीसाठी प्रेरणा देत आहेतत. आम्ही फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहे. फेसबुकला चूक पडली महागात, अकाउंट लॉक केल्याने वकिलाने घडवली चांगलीच अद्दल भारताकडे सौरउर्जा, स्टेशनरी बॅटरी पॅक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांसह उर्जेच्या भविष्यासाठी मोठी क्षमता आहे. भारतातही स्टारलिंक उपग्रह इंटरनेट सेवा आणण्याची आशा आहे असंही एलॉन मस्क यांनी म्हटलं. गेल्या महिन्यात टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी भारत दौरा केला होता. कार आणि बॅटरीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी बेस तयार करण्यासाठी चर्चेसाठी हे अधिकारी आले होते. मस्क यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं की, “टेस्ला या वर्षा अखेरीस नव्या कारखान्यासाठी एक नवं ठिकाण निवडेल. तसंच नव्या प्लांटसाठी भारतात एक जागा असू शकते.” पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चेनंतर आता ते पुन्हा भारतात येण्याचा प्लान तयार करत आहेत असंही त्यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.