मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कॅनडामध्ये पोस्टर लावून पंतप्रधान मोदींचं कौतुक, वाचा काय आहे कारण

कॅनडामध्ये पोस्टर लावून पंतप्रधान मोदींचं कौतुक, वाचा काय आहे कारण

कॅनडामध्ये (Canada) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर (PM Narendra Modi Poster in Canada) लावून त्यांचे आभार व्यक्त करण्यात  आले आहेत.

कॅनडामध्ये (Canada) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर (PM Narendra Modi Poster in Canada) लावून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

कॅनडामध्ये (Canada) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर (PM Narendra Modi Poster in Canada) लावून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

टोरंटो, कॅनडा (11 मार्च) : जगभरात गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर सुरू आहे. कोरोनाच्या भीतीने मागील वर्षातील बहुतेक काळ जग लॉकडाऊनमध्ये बंद होतं. 2021 वर्षात कोरोनावरील औषध (Corona vaccine) उपलब्ध झालं. जगातील सर्वच देशांनी आपल्या नागरिकांसाठी कोरोना व्हॅक्सिन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अडचणीच्या या काळात भारताने जगातील अनेक देशांना मदत केली आहे. नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश ते ब्राझील, कॅनडा यापर्यंत जगातील वेगवेगळ्या देशांना भारताने कोरोना व्हॅक्सिनचा पुरवठा केला आहे. याच कारणामुळे कॅनडामध्ये (Canada) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोस्टर (PM Narendra Modi Poster in Canada) लावून त्यांचे आभार व्यक्त करण्यात  आले आहेत.

भारताने 'सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडिया'ने (Serum Institute of India) बनवलेल्या कोविशिल्ड (covishield) लशीचा पुरवठा कॅनडाला दिला होता. त्याबद्दल कॅनडातील ग्रेटर टोरंटो (Greater Toronto) शहरामध्ये पंतप्रधान मोदी यांचं पोस्टर लावून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

'कॅनडाला कोव्हिड व्हॅक्सिन देण्यासाठी आभार, पंतप्रधान नरेंद्र मोदी' असं या पोस्टरवर लिहिलं आहे. कॅनडातील नागरिकांची भारताबद्दलची भावना या पोस्टरमधून दिसून येत आहे. कॅनडा सरकारने यापूर्वीच ही मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत.

यापूर्वी कॅनडानं कोरोना व्हॅक्सिन (Corona Vaccine) बाबत भारताची मदत मागितली होती. त्यावर भारतानं या विषयावर सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वसन दिलं होतं. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांच्याशी याबाबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन दिली होती.

( वाचा : Corona Vaccine: 'आधी देशाची गरज पूर्ण करा मग बाहेर पाठवा', हायकोर्टाने सरकारला सुनावलं )

पंतप्रधान कार्यालयानं (PMO) यापूर्वी एक अधिकृत वक्तव्य दिलं होतं. यामध्ये जस्टीन ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदी यांना कॅनडातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली, तसंच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कॅनडाला कोरोना व्हॅक्सिनची आवश्यकता असल्याचं सांगितल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अन्य देशांप्रमाणे कॅनडालाही सर्व प्रकारची मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं.

First published:

Tags: Canada, Corona vaccination, Corona vaccine, Fight covid, Pm narenda modi, Poster