वॉशिंग्टन डीसी, 25 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीन आणि पाकिस्तानचं नाव (PM Narendra Modi attacks Paksitan and China without taking names in UNGA) न घेता दोन्ही देशांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जे देश आज दहशतवादाला (Modi criticizes Pakistan for supporting terrorism) खतपाणी घालत आहेत, त्यांनाही त्याची फळं भोगावी लागणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. दहशतवादाचा उपयोग राजकीय फायद्यासाठी करून घेणं हे कुठल्याच देशातील जनतेच्या हिताचं नसल्याचा घणाघात त्यांनी केला.
पाकिस्तानला खडे बोले
अफगाणिस्तानातील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही, याची खातरजमा करणे हे सर्वांचं कर्तव्य आहे. मात्र काही देश तिथल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा गैरफायदा उठवत दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम करत असल्याचं मोदी म्हणाले. अफगाणिस्तानातील नाजूक आणि दोलायमान परिस्थितीचा कुठलाही देश गैरफायदा घेणार नाही, याची खबरदारी घेणं गरजेचं असल्याचा मुद्दा त्यांनी महासभेतील भाषणात मांडला.
चीनवर टीका
समुद्र ही पूर्ण विश्वाची संपदा असून त्याचं संरक्षण आणि जतन करणं हे प्रत्येक देशाचं कर्तव्य आहे. त्यामुळे समुद्राला वापर विस्तारवादासाठी आणि घुसखोरीसाठी होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक देशानं घेण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी चीनला इशारा दिला. समुद्र ही खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठीची लाईफलाईन असून विस्तारवादाच्या राक्षसी आकांक्षांपासून त्याला दूर ठेवायला हवं, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं. समुद्रात घुसखोरी करणाऱ्या आणि इतर देशांच्या सीमांमध्ये आक्रमण करणाऱ्या देशांना आंतरराष्ट्रीय समुदायानं धडा शिकवायला हवा, अशी रोखठोक मागणी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित कऱताना केली.
हे वाचा - ब्रिटिशांसमोर अजब पेच! 78 लाख रुपये पगार देऊनही मिळत नाहीत ट्रक ड्रायव्हर
आशियातील बदलणाऱ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भूमिका मांडणार, याकडं भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आक्रमक भाषणातून भारत कुठल्याही प्रकारची घुसखोरी आणि दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा इशाराच जगाच्या व्यासपीठावरून दिला आहे. यावर आता चीन आणि पाकिस्तानच्या काय प्रतिक्रिया येतात, त्याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.