वॉशिंग्टन, 23 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाउसमध्ये स्टेट डिनर केला. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि आनंद महिंद्रा यांच्यासह भारतीय वंशाचे इतर मान्यवरही उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी डिनरचे आयोजन केले होते. पंतप्रधान मोदींसाठी व्हाइट हाउसमध्ये ठेवलेल्या स्टेट डिनरमध्ये मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागडी, आनंद महिंद्रा, डॉ. दीपक मित्तल, सत्या नडेला, अनु नडेला, इंद्रा नूयी, राज नूयी हेसुद्धा पोहोचले होते. स्टेट डिनरमध्ये पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांनी संबोधितही केलं. तसंच दोन्ही देशांमधील संबंध आणखी वाढवण्यावर भर देणार असल्याचे म्हटले. यामध्ये 400 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मोदींना भारताची काळजी, मी त्यांचा फॅन; भेटीनंतर एलॉन मस्कची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, भारतीय - अमेरिकन लोकांनी दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यात आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डिनरला आलेल्या पाहुण्यांच्या यशाबद्दल आणि आनंदाबद्दल प्रार्थनाही केली. भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीपूर्ण संबंधांसह आरोग्य, समृद्धी, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा असंही मोदी म्हणाले. प्रत्येक दिवशी दोन्ही देश एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत आहेत. आम्ही एकमेकांची नावेही योग्य पद्धतीने करू शकतो. एकमेकांच्या बोलण्याची पद्धत चांगल्या प्रकारे समजू शकतो. भारतात मुले हेलोवीनला स्पायडरमॅन बनतात आणि अमेरिकेतील तरुण नाटु नाटुच्या तालावर नाचतात. मोदी म्हणाले की, अमेरिकेत बेसबॉल तर भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे. भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होण्यासाठी अमेरिकेचा संघ प्रयत्न करत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि यशाची प्रार्थना करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.