Home /News /videsh /

इटलीत गर्दीतून आला आवाज, 'नरेंद्र भाई केम छो' ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं खास शैलीत उत्तर

इटलीत गर्दीतून आला आवाज, 'नरेंद्र भाई केम छो' ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं खास शैलीत उत्तर

PM Modi in Italy: एका कार्यक्रमादरम्यान एका गटानं गुजराती स्टाईलमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.

    नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 शिखर परिषदेसह अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी इटली (Italy) दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पाहून इटलीतल्या भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी हजारोंनी गर्दी केली. एका कार्यक्रमादरम्यान एका गटानं गुजराती स्टाईलमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्याच गर्दीतून ‘नरेंद्र भाई केम छो!’असा आवाज ऐकू आला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन केलं. पंतप्रधान पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी इटलीला पोहोचले आहेत. हेही वाचा- T20 World Cup, PAK vs AFG: क्रिकेट फॅन्समध्ये जोरदार मारामारी, लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडवले! पाहा VIDEO इटलीची राजधानी रोममध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी पियाजा गांधी येथे भेट दिली. येथे त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतीयांचा एक समूह देखील तिथे पोहोचला होता. यावेळी ‘मोदी-मोदी’च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि लोकांनी संस्कृतमधील मंत्र आणि श्लोकांचे पठण केलं. यावर पीएम मोदींनी हात जोडून 'ओम नमः शिवाय' म्हटलं. त्याच दरम्यान गर्दीतून एक आवाज आला नरेंद्र भाई केम छो!. यावर पंतप्रधानांनी 'मजा मा छो' अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी भारतीय नागरिकांनी भारत मातेचा जयघोषही केला. इटलीमध्ये गुजराती स्टाईलमध्ये बोलत असलेल्या एका व्यक्तीशी पंतप्रधान मोदींनी आपल्या मातृभाषेत संवाद साधला. त्या व्यक्तीने सांगितले की तो योग आणि आयुर्वेदाच्या प्रचारासाठी काम करत आहे. हेही वाचा- T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवावर तालिबानच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला... पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी प्रथमच त्यांचे इटलीचे समकक्ष मारिया द्राघी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. इटलीच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून एक दिवस अगोदर रोममध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींचं द्राघी यांनी स्वागत केलं. विशेष म्हणजे युरोपियन युनियनमधील भारताच्या पहिल्या पाच व्यापारी भागीदारांमध्ये इटलीचा समावेश होतो.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Italy, Pm narenda modi

    पुढील बातम्या