• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवावर तालिबानच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला...

T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवावर तालिबानच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला...

आसिफ अलीनं (Asif Ali) चार सिक्स लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. आसिफच्या या फटकेबाजीमुळे अफगाणिस्तानचे अनेक फॅन्स निराश झाले. तालिबानच्या बड्या नेत्यानं अफगाणिस्तानच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:
    मुंबई, 30 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup) शुक्रवारी पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा (Pakistan Vs Afghanistan) 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये शेवपर्यंत अफगाणिस्तानच्या जिंकण्याच्या आशा कायम होत्या. पण 19 व्या ओव्हरमध्ये आसिफ अलीनं (Asif Ali) चार सिक्स लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. आसिफच्या या फटकेबाजीमुळे अफगाणिस्तानचे अनेक फॅन्स निराश झाले. तालिबानचा बडा नेता अनस हक्कानीला Anas Haqqani) देखील या पराभवाचा धक्का बसला. हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा अनस हक्कानी यानं याबाबत एक ट्विट करत अफगाणिस्तानच्या टीमचे मनोबल वाढवले आहे. त्यानं मिर्झा अजिम बेग यांच्या कवितेचा उल्लेख करत, मैदानात एक योद्धा लढताना कोसळतो. मुलं गुडघ्यावर चालत नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तान टीमने दिलेले 147 रन्सचे आव्हान पार करत असताना पाकिस्तानच्या टीमला चांगलीच दमछाक झाली. ओपनिंग जोडी तिसऱ्याच ओव्हरमध्ये फुटली. मोहम्मद रिझवान ८ रन्स करून आऊट झाला. त्यानंतर बाबर आझमने दमदार बॅटिंग करत 51 रन केले. पाकिस्तानच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडत होत्या. त्यामुळे अफगाणिस्तानची विजयाची आशा कायम होती. 17 व्या ओव्हरमध्ये मैदानात सेट झालेला बाबर आझम तर 18 व्या ओव्हरमध्ये अनुभवी शोएब मलिक आऊट झाला. त्यानंतर शेवटच्या 12 बॉलमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 24 रनची आवश्यकता होती. त्यावेळी आसिफ अलीनं करिम जनतच्या एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे. आसिफ अलीनं दुबईत पाडला सिक्सचा पाऊस, बेन स्टोक्सनं सांगितलं मोठं भविष्य अफगाणिस्तानच्या आशा कायम पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतरही अफगाणिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याची आशा कायम आहे. अफगाणिस्ताननं या स्पर्धेत आत्तापर्यंत दोन मॅच खेळल्या आहेत. त्यापैकी एकामध्ये विजय मिळवला असून एक मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. उर्वरित तीन मॅचमध्ये चांगली कामगिरी केल्यास अफगाणिस्तानची टीम सेमी फायनलमध्ये दाखल होऊ शकते.
    Published by:News18 Desk
    First published: