
चीनमध्ये कोरोनाचा पहिला विषाणू (Coronavirus) आढळून आला होता. तिथून तो जगभर पसरला. पण आता चीनमध्ये याची काहीही भीती राहिली नसून नागरिक मोठया प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. यासंदर्भातील काही फोटो समोर आले आहेत.

चीनच्या राष्ट्रीय सणाच्या दिवसाचे हे फोटो आहेत. 1 ते 8 ऑकटोबर हा आठवडा चीनचा राष्ट्रीय आठवडा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या या संकटात देखील नागरिक मोठया प्रमाणात रस्त्यावर आले आहेत. सर्व नियम देखील पायदळी तुडवले जात आहेत.

कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदा चीनमध्ये राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.1 ऑकटोबरपासून या सुट्ट्या जाहीर झाल्या असून प्रसिद्ध Huangshan Mountain या ठिकाणी पर्यटक या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

चीनच्या या राष्ट्रीय सुट्टीच्या आठवड्याला गोल्डन वीक देखील म्हटलं जात. 1949 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेपासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

गुरुवारी चीनमधील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ ग्रेट वॉल ऑफ चायना आणि डिझनीलँडमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

चीनमधील बुकिंग प्लॅटफॉर्म सिट्रिपच्या अनुसार, शेवटच्या दिवशी 600 मिलियन म्हणजे 60 कोटी चिनी पर्यटक येण्याचा अंदाज आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अनुसार, जगभरात 35 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 10 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये देखील कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या आहेत. जर अशाच पद्धतीने नागरिक रस्त्यावर उतरले तर चौथी लाट येण्याची शक्यता देखील साउथ चीन मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

प्यू रिसर्च सेंटरच्या नवीन सर्वेक्षणानुसार अनेक विकसित देशांमध्ये मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये चीनबद्दल नाराजीचा सूर आहे.

ऑस्ट्रेलियातील 81 टक्के नागरिकांचा दृष्टिकोन चीनबद्दल नकारात्मक झाला आहे. तसेच दोन देशांमधील संबंध देखील बिघडले आहेत.

ब्रिटनमध्ये चीनबद्दल 74 टक्के नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. जर्मनीमध्ये 71 टक्के तर अमेरिकेमध्ये 73 टक्के नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. ही टक्केवारी एका सर्वेक्षणातील आहे आणि हे सर्वेक्षण अमेरिका, कॅनडा, बेल्जियम, डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, स्पेन, स्वीडन, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान और दक्षिण कोरिया या 14 देशांत करण्यात आलं होतं.

अनेक देशांनी चीन हॉंगकॉंगमध्ये करत असलेल्या ढवळाढवळीचा देखील विरोध केला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळं अनेक देशांमध्ये चीनचा आदर कमी झाला आहे.

14 देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हमध्ये 61 टक्के लोकांनी चीनने कोरोनाशी व्यवस्थित सामना केला नसल्याचं म्हटलं आहे.

या सर्व्हेमध्ये अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील 83 टक्के लोकांनी नाराजी दर्शवली आहे.




