फिलीपिन्स, 19 डिसेंबर: फिलीपिन्समध्ये चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. या चक्रीवादळामुळे (Super Typhoon Rai in Philippines) जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे. फिलीपिन्सच्या बोहोल प्रांताच्या गव्हर्नरने सांगितलं की, राय चक्रीवादळामुळे किमान 49 लोकांचा मृत्यू झाला असून, तर देशातील मृतांची संख्या 100 वर पोहोचली आहे. बोहोल प्रांताचे गव्हर्नर आर्थर याप यांनी सांगितलं की, 10 लोक अद्याप बेपत्ता असून 13 जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची (Storm Latest Update)शक्यता आहे.
रविवारी फेसबुकवर दिलेल्या निवेदनानुसार, याप यांनी त्या भागातील महापौरांना तातडीची मदत आणि उपाययोजना करण्यास सांगितले आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी फिलीपिन्सच्या मध्यवर्ती भागात प्रचंड नुकसान झालं.
हेही वाचा- तलाक...तलाक...तलाक...! 'या' क्षुल्लक कारणानं पतीनं मोडला 16 वर्षांचा सुखी संसार
सुमारे 7, 80,000 लोकांना वादळाचा फटका बसल्याचं सरकारने म्हटलं आहे. त्यापैकी 3 लाख लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांरित करण्यात आलं आहे. आपत्ती प्रतिसाद एजन्सी आणि राष्ट्रीय पोलिसांनी वादळाशी संबंधित घटनांमध्ये आणखी 39 मृत्यूची पुष्टी केली आहे (Philippines Super Typhoon). आग्नेय प्रांतातील दिनागत बेटावरील वादळात किमान 10 लोकांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 98 वर पोहोचली आहे.
राष्ट्राध्यक्षांनी केलं सर्वेक्षण
राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी शनिवारी या प्रदेशाचे हवाई सर्वेक्षण केले आणि दोन अब्ज पेसो (4 कोटी डॉलर) मदतीचे आश्वासन दिलं आहे. वादळाच्या वेळी 195 किलोमीटर प्रतितास ते 270 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं वारे वाहत होते. त्यामुळे मोठे नुकसान झालं आहे. (Typhoon Rai Death Toll). वादळानंतर 227 शहरे आणि शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केवळ 21 भागात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तीन प्रादेशिक विमानतळांवर पाणी तुंबलं आहे.
संपूर्ण प्रांत भुईसपाट
वादळ गुरुवारी फिलीपिन्सच्या आग्नेय किनारपट्टीवरही धडकलं, मात्र घटनेच्या दोन दिवसांनंतरही नुकसानाची माहिती मिळाली नाही. कारण संपूर्ण प्रांतात वीज आणि मोबाइल फोन सेवा विस्कळीत झाली होती. फिलीपिन्समधील वादळाने प्रभावित झालेल्या पहिल्या प्रांतांपैकी दिनागत बेट हे एक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain