मराठी बातम्या /बातम्या /देश /तलाक...तलाक...तलाक...! 'या' क्षुल्लक कारणानं पतीनं संपवलं 16 वर्षांचं नातं

तलाक...तलाक...तलाक...! 'या' क्षुल्लक कारणानं पतीनं संपवलं 16 वर्षांचं नातं

बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे.

बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे.

बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेश, 19 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. जिथे पाणी गरम करण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. यादरम्यान पतीनं तीन वेळा तलाक-तलाक म्हणत पत्नीला तलाक (Talaq)दिला आहे. दोघांच्या लग्नाला 16 वर्षे झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय त्यांना 5 मुलेही आहेत. तिहेरी तलाक हे बेकायदेशीर असल्याचे नातेवाइकांनीही स्पष्ट केले अस असले तरी तिहेरी तलाकविरोधात कायदा होऊनही ही प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाहीत. सध्या पोलिसांनी पीडित पत्नीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला आहे.

हे प्रकरण बाराबंकी जिल्ह्यातील जहांगीराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील सदरुद्दीनपूर गावातील आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. ज्यामध्ये एका व्यक्तीने लग्नाच्या 16 वर्षांनंतर किरकोळ कारणावरून पत्नीला तिहेरी तलाक दिला. त्याचवेळी पीडितेने तिच्या भावासह तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठलं. त्यानंतर पीडितेने पोलीस अधिकाऱ्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि पतीवर घटस्फोट देऊन संबंध तोडल्याचा आरोप केला. सध्या पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

लग्नाच्या 16 वर्षानंतर पतीने तिहेरी तलाक देऊन दिला घटस्फोट

त्याचवेळी, पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पत्नीचा आरोप आहे की, तिच्या लग्नानंतर सासरचे लोक तिचा छळ करत होते. अशा परिस्थितीत त्यांना 5 मुले असून सर्वात लहान मूल फक्त 2 वर्षांचे आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी जेव्हा पतीला औषध खाण्यासाठी गरम पाणी दिले तेव्हा तो संतापला आणि म्हणाला की मी स्वतः करेन. त्यावर मी पण म्हणाले की कर. त्यानंतर या गोष्टीचा त्यांना प्रचंड राग आला. काही वेळानं त्यांनी तीनवेळा तलाक-तलाक म्हणत मला घरातून हाकलून दिले. तसेच माझ्या सर्व मुलांनाही बेदम मारहाण केली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेनं तक्रार दाखल केली असून तिच्या पतीने तिहेरी तलाक दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही सध्या या प्रकरणाचा तपास करत आहोत. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. त्याच वेळी पीडितेचे म्हणणे आहे की, तिला लहान मुले आहेत ज्यांना कोणीही सांभाळत नाही.

First published:
top videos

    Tags: Talaq bill, Uttar pradesh news