Home /News /videsh /

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! 'या' देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! 'या' देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली

    व्हिएन्ना, 16 जानेवारी: सरकारनं (Government) केलेली लसीकरणाची सक्ती (Vaccination mandatory) चुकीची असून हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर (Basic rights) गदा आणण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करत ऑस्ट्रियाची (Austria) राजधानी व्हिएन्नाची जनता (Vienna Public) रस्त्यावर उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत जनतेकडून आंदोलन (Public Protest) होण्याचे प्रकार घडत आहेत. व्हिए्न्ना सरकारनं नुकताच लसीकरणाबाबत एक नवा कायदा केला आहे, ज्यानुसार लसीकरण सर्वांना सक्तीचं केलं जाणार आहे.  काय आहे कायदा? व्हिएन्नाच्या संसदेनं नुकताच सक्तीच्या लसीकरणाबाबतचा एक कायदा मंजूर केला. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक नागरिकासाठी लसीकरण करून घेणं सक्तीचं असणार आहे. व्हिएन्नामध्ये सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सक्तीचं लसीकरण हाच योग्य उपाय असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. लसीकरण सक्तीचा करणारा व्हिएन्ना हा युरोपातील पहिला देश ठरला असून त्याला बहुतांश जनतेचा विरोध असल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.  काय आहे सर्वेक्षण प्रॉफिल नावाच्या मासिकानं याच विषयासंदर्भात एक पोल आयोजित केला होता. देशात लसीकरण सक्तीचे करण्याचा सरकारचा निर्णय तुम्हाला मान्य आहे का, असा सवाल या पोलमध्ये करण्यात आला होता. या पोलसाठी मतदान केलेल्यांपैकी 51 टक्के नागरिकांनी लसीकरण सक्तीचं करण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. यापैकी 34 जणांचा मुळात लसीकरण करण्यालाच विरोध आहे, तर 14 टक्के नागरिकांच्या मते सरकारनं हा निर्णय घेण्यात घाई केलीय.  हे वाचा - कोरोनाची स्थिती गंभीर व्हिएऩ्नामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची स्थिती गंभीर असून चौथी लाट आली आहे. सरकारनं नोव्हेंबर महिन्यापासूनच लॉकडाऊन सुरू केला होता. आतापर्यंत व्हिएन्नामध्ये 14 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 14 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरण सक्तीचं करण्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला आता सरकार कसं हाताळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus, Protest

    पुढील बातम्या