जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाची दहशत! लोकं म्हणाली, 'लॉकडाऊन हटवला तरी आम्ही घराबाहेर पडणार नाही'

कोरोनाची दहशत! लोकं म्हणाली, 'लॉकडाऊन हटवला तरी आम्ही घराबाहेर पडणार नाही'

कोरोनाची दहशत! लोकं म्हणाली, 'लॉकडाऊन हटवला तरी आम्ही घराबाहेर पडणार नाही'

ब्रिटनच्या (Britain) नागरिकांमध्ये Coronavirus चा इतका धसका घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 02 मे : कोरोनाव्हायरस (coronavirus) जास्त पसरू नये, यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (lockdown) आहे. सर्व लोकं घरातच बंदिस्त झालेत. अशात लॉकडाऊन कधी संपतो आणि आपण कधी घराबाहेर पडतो असं प्रत्येकाला वाटतं आहे. मात्र ब्रिटनमधील (britain) लोकं आता घराबाहेर पडायला घाबरत आहेत. लॉकडाऊन हटवला तरी आम्ही घराबाहेर पडणार नाही, असं इथल्या नागरिकांनी सांगितलं आहे. कोरोनाव्हायरसची दहशत या नागरिकांमध्ये आहे. द सनच्या रिपोर्टनुसार एका सर्वेक्षणात ब्रिटनच्या दोन तृतीयांश लोकांनी सांगितलं की, लॉकडाऊन हटल्यानंतरही ते गर्दी होईल अशा ठिकाणी जाणार नाहीत. हे वाचा -  कोरोनाला दूर ठेवण्यासाठी Work From Home, घरात स्ट्रेस इटिंगपासूनही बचाव करा IPSOS मुरीजने हा रिसर्च केला आहे. दोन तृतीयांश लोकांनी लॉकडाऊन हटवल्यानंतरही घरात राहण्यास पसंती दिली आहे. सार्वजनिक वाहतूक, बार आणि रेस्टॉरंटमध्ये जाण्यास या लोकांनी नकार दिला आहे. प्रत्येक सहापैकी फक्त एका नागरिकाने लॉकडाऊन हटल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाण्याची तयार झालेत. बाकी लोकांनी घरात राहण्यास पसंती दिली आहे. 48 टक्के लोकांनी मुलांना शाळेत पाठवण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 41 टक्के लोकांना मुलांना शाळेत पाठवण्यास काही हरकत नाही असं वाटतं. लॉकडाऊन हटल्यानंतर आपलं कुटुंब आणि मित्रांना भेटण्यास उत्सुक आहेत आणि त्यानंतर ते शॉपिंग आणि सुपरमार्केटमध्ये जाण्याचा विचार करतील, असं त्यांनी म्हटलं. सर्वात जास्त वयस्कर लोकं आपल्या प्रियजनांना भेटण्यास उत्सुक आहेत. लॉकडाऊन हटल्याबाबत सर्वात उत्साह तरुणांनी दाखवला आहे. तरुणांनी लॉकडाऊन हटल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये जाणार असल्याचं सांगितलं, शिवाय गर्दीच्या ठिकाणी जाण्यासही ते उत्सुक आहेत. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा -  700 वर्षांपूर्वीही समजलं Social distancing चं महत्त्व, केलं जात होतं क्वारंटइन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात