700 वर्षांपूर्वीही लोकांना समजलं Social distancing चं महत्त्व, महिनाभर केलं जात होतं क्वारंटाइन

700 वर्षांपूर्वीही लोकांना समजलं Social distancing चं महत्त्व, महिनाभर केलं जात होतं क्वारंटाइन

प्लेग ज्याला काळा आजारही म्हटलं जातं (black death or plague) त्यापासून वाचण्यासाठी युरोपमध्ये लोकं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू लागले.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जगभरात लोकांना क्वारंटाइन केलं जातं आहे. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना सोशल डिस्टन्सिंगचा (Social distancing) सल्ला देत आहे, 21 व्या शतकात व्हायरसपासून बचावासाठी असलेलं हे सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाइन आता सर्वांनाच माहिती झालं आहे. मात्र याचं महत्त्व तब्बल 700 वर्षांपूर्वीही लोकांना समजलं होतं.

ज्यावेळी प्लेग ज्याला काळा आजारही म्हटलं जातं (black death or plague) त्यापासून वाचण्यासाठी लोकांना क्वारंटाइन केलं जाऊ लागलं, लोकं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू लागले. 1348 च्या दरम्यान हे प्रचलित झालं होतं.

सोशल डिस्टेन्सिंगची अशी झाली सुरुवात

ऑक्टोबर 1347 साली जेव्हा 12 जहाज इटलीच्या सिसली बंदरावर होत्या. त्या जहाजातील प्रवाशांचं कुटुंब किनाऱ्याजवळ त्यांची वाट पाहत होते. मात्र खूप वेळ जहाजातून कोणी उतरलं नाही म्हणून ही लोकं जहाजात गेली तर जहाजात मृतदेहांचा खच होता, काही लोकंच जिवंत होती. त्यांना जहाजाबाहेर आणण्यात आलं, त्यांची हालतही फारशी चांगली नव्हती. ही लोकं बरी झाली नाहीत, मात्र त्यांच्यावर उपचार करणारी लोकंही आजारी पडू लागली.

हे वाचा - कोरोनाचं थैमान: देशातली ही 10 शहरं सर्वात धोकादायक, मुंबई सर्वात टॉपवर

आजाराची सुरुवात चीनहून झाली, जिथं व्यापारासाठी इटलीतील जहाज गेले होते. जहाज इटलीला पोहोचल्यानंतर मिलान आणि वेनिससारख्या शहरातून हा आजार 8 महिन्यात इटली, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हंगेरी, स्वित्झर्लंड, जर्मनी, स्कँडिनेविया आणि बॉल्टिकला पोहोचला. पुढील 5 वर्षांत या 12 जहाजांमुळे युरोपमध्ये एक तृतीयांश लोकसंख्येचा बळी गेला. लोकं काळी पडून मरू लागली, त्यामुळे या आजाराला ब्लॅक डेथ, काळा आजार म्हटलं जाऊ लागलं नंतर ब्युबोनिक प्लेग (Bubonic Plague) असं नाव देण्यात आलं.

त्यावेळी शास्त्रज्ञांना व्हायरस, बॅक्टेरिया याबाबत माहिती नव्हती मात्र हा आजार माणसामाणसांमध्ये पसरतो आहे, हे समजलं.

त्यानंतर या आजाराने प्रभावित झालेल्या युरोपियन देशांमध्ये सोशल डिस्टन्सिंगला सुरुवात झाली.  ऑक्सफर्ड ब्रुक्स युनिव्हर्सिटीतील आधुनिक युरोपियन इतिहासाचे प्राध्यापक जेन स्टिव्हन क्रॉशॉ यांच्या मते, इतक्या वर्षांपूर्वीही लोकांना समजलं ही हा आजाल एकमेकांना स्पर्श केल्याने, संक्रमित वस्तूंना स्पर्श केल्याने किंवा संक्रमित ठिकाणी आल्याने पसरू शकतो. त्यामुळे लोकांना यापासून वाचण्याचा सल्ला देण्यात आला.

जहाज, लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं

युरोपमध्ये Dubrovnik (तत्कालीन Adriatic port city of Ragusa) पहिलं क्षेत्र होतं, जिथं दुसऱ्या देशांहून परतलेल्या जहाजांमधील नाविकांसह प्रवाशांना क्वारंटाइन राहण्यास बंधनकारक करण्यात आलं. याचे दस्तावेजही मिळालेत. 27 ऑक्टोबर, 1377 ला शहाराच्या मेजर काऊन्सिलने एक नियम जारी केला. ज्यामध्ये प्लेग प्रभावित क्षेत्रांहून परतललेल्या जहाजांना एक महिना क्वारंटाइन पूर्ण होईपर्यंत शहराच्या आत येण्यास परवानगी नव्हती.

हे वाचा - कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी 100 वर्ष जुन्या महासाथीत डोकावण्याची गरज

क्वारंटाइनसाठी एक शहर निश्चित झालं होतं. Mrkan या ठिकाणी लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं, इतरांना तिथं येण्याजाण्यास मनाई होती. Expelling the Plague: The Health Office and the Implementation of Quarantine नावाच्या दस्तावेजात याचा उल्लेख आहे. याच्या लेखिका Zlata Blazina Tomic यांच्या मते, क्वारंटाइनमुळे प्लेगची प्रकरणं खूप कमी झाली.  यादरम्यान त्यांच्यामध्ये काही लक्षणं तर दिसत नाहीत ना हे तपासलं जात असे.

आई झाल्यानंतर 40 दिवसांचा क्वारंटाइन

सुरुवातीला आयसोलेशनचा कालावधी 30 दिवसांचा होता, ज्याला trentino म्हटलं जायचं. त्यानंतर विशिष्ट परिस्थितीत हा कालावधी 40 दिवसांचा करण्याची परवानगी डॉक्टरांना मिळाली. क्वारंटाइन शब्द इटालियन शब्द क्वारंटिनोपासून आला आहे, ज्याचा अर्थ होता 40 दिवसांचा एकांत. प्राध्यापक प्राध्यापक स्टिव्हन यांच्या मते, क्वारंटाइन पीरियड दुसऱ्या प्रकरणांमध्येही दिसून आलं. मुलांच्या जन्मानंतर 40 दिवसांपर्यंत आईला वेगळं ठेवलं जाऊ लागलं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 30, 2020, 7:20 AM IST

ताज्या बातम्या