मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सुवेझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज पुन्हा तरंगू लागलं; लवकरच जल वाहतूक कोंडी सुटणार

सुवेझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज पुन्हा तरंगू लागलं; लवकरच जल वाहतूक कोंडी सुटणार

Suez Latest News: आशिया आणि युरोप खंडाला जोडणारा इजिप्तमधील सुवेझ कालवा (Suez Canal) गेल्या काही दिवसांपासून बंद पडला होता. या कालव्यात पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने एक विशालकाय जहाज अडकून (panama trade ship stuck in suez canal) पडलं होतं. आता हे जहाज पुन्हा पाण्यात अशंता तरंगू (began to float again) लागलं आहे.

पुढे वाचा ...

काहिर, 29 मार्च: आशिया आणि युरोप खंडाला जोडणारा इजिप्तमधील सुवेझ कालवा (Suez Canal) गेल्या काही दिवसांपासून बंद पडला होता. या कालव्यात पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने एक विशालकाय जहाज अडकून (panama trade ship stuck in suez canal) पडलं होतं. त्यामुळे या कालव्यात प्रवास करण्याऱ्या इतर अनेक जहाजांना आशिया खंडातील देशांकडे जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जावं लागलं आहे. या विशालकाय जहाजाला हटवण्यासाठी दोन शक्तीशाली जहाजांच्या मदतीनं ओढावं लागलं आहे. त्यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून अडकलेलं हे जहाज पुन्हा पाण्यात अशंता तरंगू (began to float again) लागलं आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खरंतर या कालव्यातील समुद्री वाहतुकीमध्ये सध्या 450 मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. आशिया आणि युरोप दरम्यान मालवाहतूक करणाऱ्या या विशायलकाय जहाजावर पनामा देशाचा झेंडा लावला असून याच जहाजाचं नाव 'एव्हर गिव्हन' (Evergiven) असं आहे. हे जहाज गेल्या मंगळवारी सुवेझ कालव्यात पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे अडकलं होतं. त्यानंतर या जलमार्गातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. या कालव्यातून दररोज नऊ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय केला आहे.

अशाप्रकारे जहाज अडकल्याने याचा जागतिक जल वाहतुकीवर आणि व्यापारावर तीव्र परिणाम झाला आहे. जो कोरोना साथीच्या आजाराने आधीच प्रभावित आहे. मरीन ट्रॅफिक डॉट कॉमच्या सॅटेलाइट तपशिलानुसार, या महाकाय जहाजाला हटवण्यासाठी इटली आणि डच या दोन देशांच्या शक्तीशाली बोटी रविवारपासून प्रयत्न करत होत्या.

हे ही वाचा- सुएझ कालव्यातील विशाल जहाजाला मदत करतोय बुलडोझर; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

हे जहाज सध्या अशंता पाण्यात तरंगत असलं तरी सुवेझ कालव्यातून होणारी जलवाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो. तसेच या जहाजात दरम्यानच्या काळात काही प्रमाणात बिघाड झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लाटांच्या साह्याने हे जहाज पुन्हा पाण्यात व्यवस्थित तरंगू लागल्यानंतर त्यातील काही कंटेनर खाली उतरवले जाण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Ship stuck in the sea