नवी दिल्ली, 26 मार्च : इजिप्तमधील सुएझ कालव्यात (Suez Canal) कोणती घटना घडलीय, हे एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचलंच आहे. या कालव्याच्या मार्गात विशाल मालवाहू जहाज अडकले आहे. परंतु, दुर्देवानं त्याचे विनोदी फोटो आणि मीम्स (Memes) सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये महाकाय जहाज मार्गातून बाजूला करण्याचे सुरु असलेले प्रयत्न आणि त्यासाठी काम करीत असलेला छोटा बुलडोझर (Mini Bulldozer) दिसत आहेत. इजिप्तमधील सुएझ कालव्यातील मार्गावर एक गगनचुंबी जहाज अडकून बसले असून, त्यामुळे जागतिक जलवाहतुकीला (Global Shipping) मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या घटनेमुळे किमान 150 जहाजं हा अडथळा कधी मोकळा होईल याची वाट पाहात समुद्रातच थांबून आहेत. या जहाजामुळे सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. जगातील सर्वात मोठे शिपिंग जाम म्हणून या घटनेकडं पाहिलं जात आहे. तैवानमधील एव्हरग्रीन मरीन कंपनीचं 2,00,000 टन वजनाचं एव्हर गिव्हन हे जहाज जोरदार वाऱ्यामुळं सुएझ कालव्यातील मार्गावर अडकलं आहे. या घटनेमुळं अतिशय महत्वाच्या असलेल्या या समुद्री मार्गावरील दोन्ही बाजूला अनेक जहाजं अडकून पडली आहेत. सुएझ कालवा हा भूमध्य समुद्र आणि रेड समुद्राला जोडतो. हा आशिया आणि युरोप दरम्यानचा सर्वातजवळचा समुद्री मार्ग देखील आहे. अडकलेलं जहाज बाहेर काढण्यासाठी अनेक बोटी सज्ज असून,मदत कार्य वेगानं सुरू आहे. जहाजामुळे बंद झालेला मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, या जहाजाजवळ वाहून आलेला गाळ आणि माती साफ करण्यासाठी तसेच मदतीसाठी बुलडोझर आणण्यात आला आहे. महाकाय जहाजाच्या तुलनेत असलेला छोटासा बुलडोझर सध्या विनोदाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
या घटनेबाबत मीम्स शेअर करताना एक युझर म्हणतो, मला खूप गेम्स खेळावेसे वाटतात. पण माझा पीसी या छायाचित्रातील टिनी बुलडोझर प्रमाणे आहे. मला पैशांची गरज या जहाजाएवढी आहे. पण माझा पगार टिनी बुलडोझर प्रमाणे. दुसरा युझर म्हणतो, मला या बुलडोझरच्या आकाराएवढे म्हणजेच 43.75 डॉलर्स खर्चासाठी मिळतात. पण माझा खर्च या जहाजाएवढा असून या रकमेत मला भाडं, बिलं, अन्न, कपडे, औषधं आणि दळणवळणाचा खर्च भागवावा लागतो. हे ही वाचा- एवढ्याशा पालीची शिकार करणं सिंहाला पडलं चागलंच भारी; नेमकं काय झालं पाहा VIDEO
मला जहाजासारखं विशाल असं लेखन करायचंय मात्र माझ्याकडे प्रेरणा मात्र या लहान बुलडोझरप्रमाणे आहे,असे एका युझर्सनं म्हटलं आहे. दुसरी एक युझर म्हणते,मला या जहाजासारखंच कोरोनामुळं डिप्रेशन आणि एन्झायटी आली आहे. त्यावर मी बुलडोझरसारखा छोटासा म्हणजेच दररोज पायी फिरण्याचा उपाय करतेय.
— jeremy poxon (@JeremyPoxon) March 25, 2021
हे जहाज उत्तरेकडील भूमध्य समुद्राला दक्षिणेतील लाल समुद्राशी जोडणाऱ्या अरुंद अशा सुएझ कालव्यात अडकून पडले आहे. हा जलमार्ग अत्यंत अरुंद म्हणजेच काही ठिकाणी 675 फूट रुंदीपेक्षाही (205 मीटर) कमी आहे. जगातील प्रमुख जलमार्गांपैकी हा कालवा असून,त्याचा वापर मध्य-पूर्वेकडून युरोप आणि उत्तर अमेरिकेत टॅंकर्सव्दारे क्रुड पाठवण्यासाठी केला जातो. हे जहाज अडकून बसल्यानं बुधवारी दुपारपर्यंत 3,79,000.20 फूट कंटेनर्स असलेली 34 जहाजं कालव्यातून जाऊ शकली नाहीत. याबाबत तातडीनं तोडगा निघाला नाही तर तोटा तर वाढेलच परंतु दोन्ही बाजूंची वाहतूक देखील वाढणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,हे अवाढव्य जहाज या मार्गातून हटवणं सोपं नाही. याबाबत बुधवारी माहिती देताना जहाजाच्या तांत्रिक व्यवस्थापकांनी (Technical Manager)सांगितलं की एव्हर गिव्हनच्या आसपासची वाळू आणि चिखल साफ करण्यासाठी ड्रेजिंग उपकरणं तैनात करण्यात आली होती. तथापि या प्रक्रियेस आठवडाभरा पेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. दरम्यान जहाज बाहेर खेचण्यापूर्वी ड्रेजर्स हे जहाज दोन्ही बाजूनं लूज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,जोपर्यंत समुद्राला जोरदार भरती येत नाही तोपर्यंत प्रयत्न विफल ठरु शकतात. हे जहाज रविवार किंवा सोमवारपूर्वी मोकळं होऊ शकत नाही.