जेरुसलेम, 27 डिसेंबर: जगात समलैंगिकता (Homosexuality) वाढत असल्यामुळेच कोरोना (Corona) फैलावल्याची मुक्ताफळं एका इमामांनी (Shahi Imam) उधळली आहेत. पॅलेस्टाईनचे (Palestine) इस्लामी इमाम शेख इस्साम अमीरा (Sheikh Issam Amira) यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. जेरूसलेममध्ये (Jerusalem) असणाऱ्या जगप्रसिद्ध अल-अक्सा मशिदीचे ते इमाम आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असून त्यांनी केलेल्या या अशास्त्रीय विधानाचा जगभरातून समाचार घेतला जात आहे. जगात पसरणारा कोरोना आणि समलैंगिकता यांचा जवळचा संबंध असून जोपर्यंत अशा प्रकारांना आळा बसत नाही, तोपर्यंत नवनवे रोग आणि आजार येत राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
#ICYMI: Palestinian Islamic Scholar Sheikh Issam Amira in Al-Aqsa Mosque Address: The Omicron Variant Has Been Brought Upon US Because of Muslim Rulers Who Permit Homosexuality, Follow Feminist Organizations #COVID19 #covidvariant #OmicronVariant #homophobia #Palestinians pic.twitter.com/EUXCBn2mH6
— MEMRI (@MEMRIReports) December 27, 2021
मुस्लीम शासकांना सुनावले
आपल्या देशातील मुस्लीम शासकांचं वर्तन आणि निर्णयप्रक्रिया क्रूर आणि इस्लामविरोधी असल्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला, असा आरोप इमामांनी केला आहे. मुस्लीम शासक समलैंगिकतेसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत असून त्यामुळेच ओमिक्रॉनसारखा व्हेरियंट जगभरात धुमाकूळ घालत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मीडियावरही टीका
मीडियाचा उल्लेख त्यांनी काफीर असा केला आहे. मीडिया सातत्यानं असत्य पसरवण्याचा प्रयत्न करत असून कोरोना पसरण्यामागचं खरं कारण लपवून ठेवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मीडिया कोरोनाबाबत अनेक चुकीच्या गोष्टींचा आणि माहितीचा प्रसार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
स्त्रीवादी संघटनांना विरोध
सरकार स्त्रीवादी संघटनांना देत असलेला पाठिंबा हीदेखील चिंतेची बाब असल्याचं शेख इस्साम अमीरा यांनी म्हटलं आहे. स्त्रीवादी संघटनांना गांभिर्यानं घेणं, त्यांच्या सूचनांचं पालन करणं आणि समलैंगिकतेला मान्यता देणं यासारख्या अक्षम्य गोष्टी केल्याचा परिणाम आज संपूर्ण जगाला भोगावा लागत असून सर्वसामान्य मुस्लीमांनी शासकांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
हे वाचा-35 कोटींची लॉटरी जिंकताच बदललं मन, प्रियकराचं गर्लफ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य
जगभरातून होतेय टीका
इमामांच्या या वक्तव्यावर जगभरातून टीकेची झोड उठवली जात आहे. इमाम आजही पाचव्या शतकात आहेत काय, अशी विचारणा जगभरातील अनेक नागरिक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Palestinian