Home /News /videsh /

मुंबईतील प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या तरुणाने लढवली शक्कल पण सीमेजवळ आल्यावर गेली अक्कल!

मुंबईतील प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या तरुणाने लढवली शक्कल पण सीमेजवळ आल्यावर गेली अक्कल!

एका भारतीय तरुणीच्या प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी तरुणानं बेकायदेशीरपणे (illegally) सीमारेषा (borders) ओलांडण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील अनुपगड (Rajasthan Anupgarh) येथे सीमा सुरक्षा दलानं (BSF) मोहम्मद अहमर या 21 वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अटक केली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 4 जानेवारी : भारत (India) आणि पाकिस्तानचं (Pakistan) वैर हे सर्वांनाच माहिती आहे. दोन्ही देशांदरम्यान सतत काहीना काही कारणांवरून तणावाची स्थिती निर्माण होते. विशेषत: उभय देशांच्या सीमांलगत पाकिस्तानी सैनिक, दहशतवादी आणि नागरिकांकडून होणाऱ्या घुसखोरीमुळे सर्वात जास्त तणाव निर्माण होतो. मात्र, या सर्व गोष्टींचा फटका दोन्ही देशांतील काही सामान्य नागरिकांना बसत असल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना समोर आली आहे. एका भारतीय तरुणीच्या प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी तरुणानं बेकायदेशीरपणे (illegally) सीमारेषा (borders) ओलांडण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील अनुपगड (Rajasthan Anupgarh) येथे सीमा सुरक्षा दलानं (BSF) मोहम्मद अहमर या 21 वर्षीय पाकिस्तानी तरुणाला अटक केली आहे. बीबीसी हिंदीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफनं ताब्यात घेतलेला मोहम्मद अहमर पाकिस्तानातील बहावलपुर (Pakistan Bahawalpur) शहरामध्ये राहणारा आहे. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून त्याची मुंबईतील एका तरुणीशी ओळख झाली होती. पुढे या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. मोहम्मदच्या कथित भारतीय प्रेयसीनं त्याला भेटण्यासाठी भारतात येण्याची गळ घातली होती. म्हणून त्यानं 4 डिसेंबर 2021 रोजी भारत-पाकिस्तान सीमा (Indo-Pakistan border) ओलांडण्याचा प्रयत्न केला. आपण अगोदर भारताचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, व्हिसा न मिळाल्यानं अवैधरित्या भारतात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं मोहम्मदनं चौकशीदरम्यान सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात फक्त पाचशे रुपये आढळले. मोहम्मद अहमर नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीनं राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगड भागात पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बीएसएफच्या शेरपुरा आणि कैलाश चौकी दरम्यानची सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात असताना बीएसएफच्या जवानांनी त्याला पकडले. एकतर्फी प्रेमातून क्रूर कृत्य; अपहरण करत महिलेच्या हातावर लिहिला धक्कादायक मेसेज विशेष म्हणजे त्याला जवानांनी शरण येण्यास सांगितल्यानंतर तो लगेच शरण आला. अनुपगड आणि मुंबईदरम्यान एक हजार 400 किमी अंतर आहे, याचीही त्याला कल्पना नव्हती. सीमारेषा पार केल्यानंतर आपण लगेच मुंबईमध्ये पोहचू अशी त्याची अपेक्षा होती, अशी माहिती श्रीगंगानगरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा (SP Anand Sharma) यांनी दिली आहे. स्थानिक एसएचओ (SHO) फुलचंद यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी तरुणाला अटक केल्यानंतर विविध सुरक्षा एजन्सीतील अधिकाऱ्यांची एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यांनी मोहम्मद नावाच्या तरुणाची कसून चौकशी केली आहे. याशिवाय त्यांनी मोहम्मदनं दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबईला जाऊन त्याच्या कथित प्रेयसीची देखील चौकशी केली आहे. तिनं दिलेल्या माहितीवरून अटक केलेला पाकिस्तानी तरुण खरं बोलत असल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, अद्याप केंद्रीय तपास एजन्सीच्या वतीनं (Central Investigation Agency) होणारी चौकशी बाकी आहे. त्यामध्ये हा तरुण निर्दोष आढळल्यास त्याला पाकिस्तानच्या हवाली करण्यात येईल, अशी माहिती एसएचओ फुलचंद यांनी दिली. तपास अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या मोहम्मद अहमरच्या कुटुंबाबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मोहम्मद सामान्य पाकिस्तानी कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. जेव्हा त्याची सर्व चौकशी पूर्ण होईल आणि तो निर्दोष असल्याचं सिद्ध होईल तेव्हा बीएसएफची एक टीम पाकिस्तानी रेंजर्ससोबत एक फ्लॅग मीटिंग (Flag meeting) करेल. पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला आपला नागरिक म्हणून स्वीकारलं तर मोहम्मद आपल्या घरी जाऊ शकतो, असं एसपी शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. जुळ्यांच्या जन्माने रचला इतिहास, पहिला जन्मला 2021 मध्ये तर दुसरा 2022 साली एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीनं अशा प्रकारे भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या वर्षी (2021) नोव्हेंबर, ऑगस्ट महिन्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी भारतीय सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. एप्रिल महिन्यामध्ये एका आठ वर्षाच्या मुलानं चुकून बाडमेर सेक्टरमध्ये अंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. याउलट भारतातून देखील काही व्यक्ती पाकिस्तानात गेलेल्या आहेत. 2020 मध्ये महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणानं प्रेयसीसाठी कराचीला जाण्याचा प्रयत्न केला होता.
    First published:

    Tags: India vs Pakistan, Indian army, Love

    पुढील बातम्या