मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पाकिस्तानात फिरायला आलेल्या अमेरिकन Vlogger सोबत धक्कादायक कृत्य; एकाला अटक

पाकिस्तानात फिरायला आलेल्या अमेरिकन Vlogger सोबत धक्कादायक कृत्य; एकाला अटक

ही अमेरिकन (U.S. Citizen) महिला व्ह्लॉगर पाकिस्तानात गेल्या सात महिन्यांपासून राहत होती. मात्र सोशल मीडियावरील मित्रांनी आमंत्रण दिल्यानं ती फोर्ट मुनरो इथं व्ह्लॉग करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

लाहोर, 24 जुलै : पाकिस्तानमध्ये (Pakistan) परदेशी नागरिकांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका महिलेवर सामूहिक बलात्काराची (Gang Rape) घटना नुकतीच घडली आहे. ही महिला अमेरिकेतून पाकिस्तानात व्ही लॉग (व्ह्लॉग Vlog) तयार करण्यासाठी आली होती. बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. दैनिक जागरणच्या वेबसाईटनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. अमेरिकेतील एक युवती गेल्या सात महिन्यांपासून पाकिस्तानात राहत होती. टूरिस्ट व्हिसावर आलेली ही मुलगी व्ह्लॉगर (Vlogger) आहे. पीडिता 17 जुलैला तिचे मित्र मुझम्मिल सिप्रा आणि अजान खोसा यांच्यासोबत व्ह्लॉग बनवायला गेली होती. आरोपींनी डिजी खान जिल्ह्यातील फोर्ट मुनरो या हिल स्टेशनवर तिच्यावर अत्याचार केला. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मित्र मुझम्मिल यानं तिला कराचीवरून फोर्ट मुनरो इथे येण्याचं आमंत्रण दिलं होतं, असं डीजी खान जिल्ह्याचे डीसीपी अन्वर बरियार यांनी सांगितलं. मुझम्मिल आणि अजान यांच्याशी तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. रविवारी पीडिता पंजाबच्या राजनपूर जिल्ह्यातील सिप्राच्या घरी गेली होती. हे ठिकाण लाहोरपासून 550 किलोमीटर अंतरावर आहे. एफआयआरमधील रिपोर्टनुसार, पीडिता रविवारी फोर्ट मुनरो इथं गेली होती. तिथे तिनं सिप्रा आणि अजान खोसा यांच्यासोबत एक व्ह्लॉग तयार केला. फोर्ट मुनरो इथं आम्ही एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. तिथेच त्या दोघांनी माझ्यावर सामूहिक अत्याचार केला. तसंच मला ब्लॅकमेल करण्यासाठी एक व्हिडिओसुद्धा तयार केला, असं पीडितेनं सांगितलं आहे. वारंवार जुळी झाल्याने नवरा संतप्त; पाचव्यांदाही ट्विन्स होताच बायको, मुलांना... बॉर्डर फोर्स पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी छापेमारी सुरू आहे. आरोपींविरुद्ध विविध कलमांअंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री हमजा शाहबाज यांनी घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेच्या चौकशीबाबत व्यक्तिगत पातळीवर देखरेख करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पंजाब पोलीस प्रमुखांना दिले आहेत. त्या आरोपींना कडक शिक्षा केली जाईल, तसंच पीडितेला न्याय दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ही अमेरिकन (U.S. Citizen) महिला व्ह्लॉगर पाकिस्तानात गेल्या सात महिन्यांपासून राहत होती. मात्र सोशल मीडियावरील मित्रांनी आमंत्रण दिल्यानं ती फोर्ट मुनरो इथं व्ह्लॉग करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आला. एका आरोपीला अटक झाली असून, या पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
First published:

Tags: Crime, Pakistan

पुढील बातम्या