'...तर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल', इम्रान खान यांनी जगभरातल्या देशांकडे मागितली मदत

'...तर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल', इम्रान खान यांनी जगभरातल्या देशांकडे मागितली मदत

इम्रान यांनी रविवारी इस्लामाबादमधील काश्मीरमध्ये दहशतवादाचे समर्थन करत पाकविरुद्ध 'छळ मोहीम राबविण्याची' संधी निर्माण केली जात असल्याचा आरोप भारतावर केला.

  • Share this:

इस्लामाबाद, 18 मे : पाकिस्तानचे (Paskitan) प्रधानमंत्री इम्रान खान (Imran Khan) यांना गेल्या काही दिवसांपासून भारताकडून भीती वाटत आहे. ही भीती आहे, भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) किंवा एअर स्ट्राइक करेल याची. एकीकडे पाकमध्ये कोरोनानं थैमान घातले आहे तर, दुसरीकडे गरिबी आणि उपासमारीनं लोकांचा मृत्यू होत असताना इम्रान सध्या वेगळ्याच चिंतेत आहेत. इम्रान खान आपला वेळ भारतविरोधी प्रॉपागेंडा पसरवण्याचे काम करत आहेत. इम्रान यांनी रविवारी इस्लामाबादमधील काश्मीरमध्ये दहशतवादाचे समर्थन करत पाकविरुद्ध 'छळ मोहीम राबविण्याची' संधी निर्माण केली जात असल्याचा आरोप भारतावर केला.

इम्रान यांनी पुन्हा ट्विटरवर आरोप केला की भारत सरकार काश्मिरींना आत्मनिर्णयनाच्या हक्कापासून दूर ठेवू इच्छित आहे. भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार काश्मिरींना मिळालेल्या आत्मनिर्णयनाच्या अधिकारासाठी संघर्षाला पाक समर्थित दहशतवादाच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं पाकिस्तानविरुद्ध 'छळ मोहीम' राबवण्याची संधी मिळेल आणि जगाचे लक्ष काश्मीरमधून वळवले जाईल, असे आरोप इम्रान यांनी ट्वीटच्या मालिकेत केले.

वाचा-जगातल्या या देशांमध्ये कोरोनाचा दुसरा उद्रेक होणार, शास्त्रज्ञांचा इशारा

वाचा-आजपासून Lockdown 4.0ला सुरुवात, हे होणारे बदल लक्षात ठेवा!

भारताने फेटाळून लावले आरोप

पाकिस्ताननं शनिवारी भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे विधान नाकारले, ज्यात ते म्हणाले होते की, काश्मीरमधील 'द रेसिस्टन्स फ्रंट' नावाच्या नव्या 'दहशतवादी संघटने'ला ते पाठिंबा देत आहेत. जनरल नरवणे यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, 'मी हे सांगू इच्छित आहे की युद्धबंदीच्या उल्लंघनाच्या प्रत्येक कृतीत आणि दहशतवादाला (पाकिस्तानच्या) पाठिंबा दिल्याबद्दल भारत योग्य प्रतिसाद देईल. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे.

वाचा-भारतातील 'आत्मनिर्भर' गावं, कोरोनाच्या संकटानंतर देशासाठी ठरू शकतात मॉडेल

इम्रान यांनी मागितली मदत

गेली काही दिवसांपासून इम्रान रान खान वारंवार भारत त्यांच्यावर हल्ला करू शकेल अशी भीती आहे. त्यांनी यापूर्वीही ट्विट केले होते की, 'काश्मीरबाबत मोदींचे-संघ प्रेरित धोरण स्पष्ट आहे. काश्मिरींकडून अवैधरित्या त्यांचे अधिकार काढून घेतले. मोदी सरकार काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल अमानुषपणे विचार करत आहे, असा आरोप इम्रान यांनी केला. दरम्यान, भारतानं जागतिक मंचावर हे स्पष्ट केले आहे की काश्मीरमधून कलम 370 काढून टाकणे ही आपली अंतर्गत बाब आहे, म्हणून यावर कोणत्याही इतर देशांचा किंवा व्यक्तीचा हस्तक्षेप न्याय्य नाही.

First published: May 18, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या