महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाचा कायापालट सरपंच पोपटराव पवार यांनी केला. 1989 पर्यंत डोंगर आणि शेती उजाड झाली होती. लोक व्यसनांच्या आहारी गेले होते. तेव्हा पोपटराव पवार सरपंच झाल्यानंतर गावात अनेक सुधारणा केल्या. आता गावातील 50 ते 60 लोकांचं वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे.