मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

संतापजनक! 'बुरखा घाला, म्हणजे बलात्कार होणार नाहीत'; पाक पंतप्रधानांच्या अजब सल्ल्याने सोशल मीडिया पेटला

संतापजनक! 'बुरखा घाला, म्हणजे बलात्कार होणार नाहीत'; पाक पंतप्रधानांच्या अजब सल्ल्याने सोशल मीडिया पेटला

त्यातच इम्रान खान यांचा एक उघडा फोटो ट्रेंड होतो आहे. या जुन्या फोटोत ते एका बिकीनी घातलेल्या परदेशी युवतीबरोबर समुद्रकिनाऱ्यावर दिसतात.

त्यातच इम्रान खान यांचा एक उघडा फोटो ट्रेंड होतो आहे. या जुन्या फोटोत ते एका बिकीनी घातलेल्या परदेशी युवतीबरोबर समुद्रकिनाऱ्यावर दिसतात.

त्यातच इम्रान खान यांचा एक उघडा फोटो ट्रेंड होतो आहे. या जुन्या फोटोत ते एका बिकीनी घातलेल्या परदेशी युवतीबरोबर समुद्रकिनाऱ्यावर दिसतात.

इस्लामाबाद, 6 एप्रिल: बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महिलांनी बुरखा परिधान करावा, असा अजब सल्ला देणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) आपल्या सल्ल्यामुळेच सोशल मीडियावर ट्रोल (Imran Khan comment on rape gets Trolled) झाले आहेत. बलात्कारापासून बचावासाठी महिलांनी बुरख्याचा वापर करावा, असे इम्रान खान यांनी नुकतंच म्हटलं आहे. त्यांच्या या सल्ल्यानंतर सोशल मिडीयावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. तसेच नेटकऱ्यांनी बिकीनी परिधान केलेल्या परदेशी तरुणीसोबत स्विमिंग कॉश्चुम घातलेले इम्रान खान समुद्रातून बाहेर येत असलेला एक जुना व्हिडिओ (Beach Video) सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल केला आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलांनी बुरखा परिधान करावा, असा सल्ला दिला. हा सल्ला देताच त्यांच्यावर चौफेर टिका होऊ लागली आहे. पाकिस्तानी जनताच त्यांच्या या सल्ल्यावर प्रश्न उपस्थित करीत आहे. त्यातच इम्रान खान यांचा असा उघडा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यात इम्रान खान एका बिकीनी घातलेल्या परदेशी तरुणीसोबत समुद्री स्नान करुन बाहेर पडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इम्रान यांच्या तरुणपणीचा आहे.

लग्नाच्या दिवशीच locha झाला! होणारी बायको निघाली बहीण; पुढे काय झाला निर्णय पाहा

अशा प्रकारचा सल्ला देताच इम्रान खान जोरदार ट्रोल झाले असून, त्यांचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याबाबत फहद नावाच्या युझरने व्टिट करत म्हटलं आहे की इम्रान खान बुरखा परिधान करण्याबाबत लेक्चर देत आहेत, मात्र या व्हिडीओमध्ये ते स्वतः बिकीनी परिधान केलेल्या एका महिलेसोबत अंघोळ करताना दिसत आहेत. इम्रान खान यांचा हा व्हिडीओ तसा खूप जुना म्हणजेच ते क्रिकेटर (Cricket) होते त्यावेळचा आहे. परंतु, हाच व्हिडीओ आता त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. बलात्काराच्या (Rape) वाढत्या घटना रोखण्यासाठी इम्रान खान सरकारने कडक कायदा केला आहे. या कायद्यानुसार असे दुष्कृत्य करणाऱ्यास औषध देऊन नपुंसक बनवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

वाढत्या अश्लीलतेला युरोप (Europe) आणि भारत (India) हे देश कारणीभूत आहेत, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान खान यांनी जनतेशी थेट संवाद साधताना एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं की बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी मला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. प्रलोभनापासून वाचण्यासाठी आपल्याला बुरखा प्रथेला प्रोत्साहन दिले पाहिजे. दिल्लीला बलात्काराची राजधानी समजलं जातं तर युरोपमध्ये अश्लीलतेमुळे कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी अश्लीलता कमी करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.

---------------------

First published:

Tags: Pak pm Imran Khan, Pakistan