इस्लामाबाद, 13 मार्च : पाकिस्तानच्या सिनेटमध्ये (Pakistan Senate) पुन्हा एकदा जोरदार गोंधळ झाला आहे. सिनेटच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी शुक्रवारी मतदान होत होतं. त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहात छुपे कॅमेरे (spy cameras) सापडले. सिनेटमधील 48 नवनिर्वाचित सदस्यांनी यापूर्वी सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्या सदस्यांचा कार्यकाळ 11 मार्च रोजी संपत आहे, त्या जागांसाठी 3 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
पाकिस्तान पिपल्स पार्टी (PPP) चे सिनेटर मुस्तफा नवाज खोखर (Mustafa Nawaz Khokhar) यांनी सिनेटमध्ये कॅमेरा लावण्यात आल्याचा आरोप केला. आपण आणि पीएमएल-एन गटाचे सिनेटर मुसादीक मलिक यांनी सिनेटच्या पोलिंग बूथमध्ये लावण्यात आलेले छुपे कॅमेरे शोधले असा दावा खोखर यांनी केला आहे. इम्रान खान सरकार (Imran Khan Government) कशा पद्धतीने काम करत आहे, हे यामधून स्पष्ट होतं, असा आरोप खोखर यांनी केला.
खोखर यांनी सिनेटमध्ये छुपे कॅमेरे लावल्याचा आरोप करताच सभागृहात जोरदार गोंधळ झाला. सिनेटवर कुणाचं नियंत्रण आहे? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. या सदस्यांनी सभापती आणि उपसभापती पदाचे सुरू असलेलं मतदान देखील बंद पाडलं. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसऱ्या पोलिंग बुथवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
( कोरोना वुहानच्या लॅबमधून नाही पण...'; चीनला गेलेल्या WHO च्या टीमचा मोठा खुलासा )
सरकारने फेटाळले आरोप
दरम्यान, पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुप्त कॅमेरे लावले असते, तर कुणालाही समजले नसते. त्या कॅमेऱ्यांचा शोध घेणं इतकं सोपे नसतं. खासदारांना CCTV कॅमेरा हाच गुप्त कॅमेरा वाटला असल्याची शक्यता आहे, ' असा दावा चौधरी यांनी केला आहे.
पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या सिनेटमधील निवडणुकीत माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी याांचा विजय झाला होता. गिलानी यांचा विजय हा इम्रान खान सरकारसाठी मोठा धक्का होता. त्यामुळे इम्रान सरकारने आपल्याच पक्षातील सदस्यांवर नजर ठेवण्यासाठी गुप्त कॅमेरे बसवले असावेत अशीही चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Imran khan, Pakistan