जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / पाकिस्तान पुन्हा भारताविरोधात रचतोय कट?, अमेरिकेच्या अहवालात धक्कादायक खुलासा

पाकिस्तान पुन्हा भारताविरोधात रचतोय कट?, अमेरिकेच्या अहवालात धक्कादायक खुलासा

पाकिस्तान पुन्हा भारताविरोधात रचतोय कट?, अमेरिकेच्या अहवालात धक्कादायक खुलासा

पाकिस्तान (Pakistan)पुन्हा एकदा भारताविरोधात (India) कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या एका अहवालातून ही बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 05 फेब्रुवारी: पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा भारताविरोधात (India) कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या एका अहवालातून ही बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या (US Report) एका अहवालात म्हटलं आहे कि, पाकिस्ताननं भारतामध्ये द्वेष पसरवणे, जातीय सलोखा बिघडवणे आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या पूर्वीच्या रणनीतीवर काम करणे सुरू केलं आहे. पाकिस्तान शांतता बिघडवण्यासाठी भारताविरुद्धच्या जिहादी कारवायांचे समर्थन करत आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्या जुन्या रणनीतीचा अवलंब करत नापाक मनसुबे राबवू लागला आहे. भारतासह अमेरिकेलाही धोका अमेरिकन थिंक टँक हडसन इन्स्टिट्यूटच्या (Hudson Institute) अहवालानुसार, पाकिस्तानच्या (Pakistan) सुरक्षा यंत्रणेनं अनेक दशकांपासून लक्ष्यित जिहादी आणि खलिस्तानी गटांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. हा उपक्रम पुन्हा सुरू होणं हा भारताबरोबरच अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेसाठीही चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे जर्मनीमध्ये अलीकडेच झालेल्या अटकेवरून भारतात अतिरेकी पसरवण्यास इस्लामाबादचा पाठिंबा असल्याचं दिसून येते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जसविंदर सिंह मुलतानी याला लुधियाना न्यायालयात स्फोट घडवून आणल्याच्या आरोपाखाली जर्मनीतून अटक करण्यात आली होती. SFJ च्या माध्यमातून कट अहवालात म्हटलं आहे कि, भारतीय अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासाठी युरोपस्थित शीख फुटीरतावाद्यांना जबाबदार धरलं आहे आणि मुल्तानी हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांचा असा विश्वास होता कि, मुल्तानीचे पाकिस्तानशी संबंध होते आणि तो सीमा ओलांडून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तस्करीत सामील होता. हडसन संस्थेच्या म्हणण्यानुसार, जसविंदर सिंग मुल्तानी हा शीख फॉर जस्टिस मूव्हमेंट (SFJ) चे प्रमुख सदस्य आहे. SFJ चे सार्वजनिक चेहरा, गुरपतवंत सिंग पन्नून यानं या वस्तुस्थितीची पुष्टी केली आहे आणि मुल्तानीशी त्यांचे जवळचे संबंध उघड केले आहेत. भारत-अमेरिका संबंध बिघडवण्याचा हेतू वर्षानुवर्षे शीख फॉर जस्टिस पाकिस्तानचे पंतप्रधान, रशिया आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांना जाहीर पत्रे लिहून भारताविरुद्ध पाठिंबा मागत आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, खलिस्तानचा मुद्दा हा भारतासाठी पूर्णपणे अंतर्गत मुद्दा असू शकतो. मात्र अलीकडेच अमेरिकेत खलिस्तानशी संबंधित भारतविरोधी सक्रियता वाढल्यानं इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिका-भारत संबंधांना धोका आहे. त्यामुळेच चीनचा महत्त्वाचा मित्र मानला जाणारा पाकिस्तान यात स्वार्थी देश ठरला आहे ज्याचा उद्देश भारत-अमेरिका सहकार्य कमकुवत करणे हा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात