इस्लामाबाद, 8 एप्रिल : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ज्यात नॅशनल असेंब्ली बरखास्त करणे आणि पंतप्रधान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना दिलेला सल्ला असंवैधानिक ठरवला आहे. देशाला संबोधित करताना त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर खेद व्यक्त केला आणि म्हटले की, परकीय कारस्थानाची बाब न्यायालयाला का दिसली नाही, न्यायालयाला पुरावे दिसायला हवे होते. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या एका सर्वोच्च नेत्याने सांगितले की ‘कप्तान’ इम्रान खान शुक्रवारी “महत्त्वाची घोषणा” करतील आणि देशाला कधीही निराश करू देणार नाहीत. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या एका दिवसानंतर पंतप्रधान खान देशाला संबोधित करतील ज्यात त्यांना त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यास सांगितले होते. पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, पंतप्रधान खान राष्ट्राला उद्देशून त्यांच्या भाषणात एक “महत्त्वाची घोषणा” करतील, जी शुक्रवारी रात्री प्रसारित केली जाईल, असे डॉन वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) नेते फैसल जावेद खान यांच्या मते, खान यांना त्यांच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना कसे सामोरे जावे हे चांगलेच ठाऊक आहे. 9 एप्रिल रोजी अविश्वास ठरावावर मतदान अहवालात त्यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, “विरोधकांना वाटतंय की ते जिंकले आहेत, परंतु असं नाहीय. ते हरले आहेत.’’ चौधरी म्हणाले, ‘कॅप्टन (खान) आज महत्त्वाची घोषणा करणार आहेत. ते देशाला कधीही निराश होऊ देणार नाहीत. विशेष म्हणजे नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव आणण्यापूर्वी खान यांनी गेल्या आठवड्यात सभागृहात बहुमत गमावले होते. शनिवारी नॅशनल असेंब्लीत खान यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. Pakistan crisis: इम्रान खान यांचे हाल जनरल मुशर्रफ यांच्यासारखे होणार? सत्ता मिळाली नाही तर होईल ही शिक्षा विरोधी पक्षांना आवश्यक पाठिंबा पंतप्रधान खान यांची हकालपट्टी करण्यासाठी विरोधी पक्षांना 342 सदस्यांच्या सभागृहात 172 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे आणि त्यांनी आधीच आवश्यक संख्येपेक्षा जास्त लोकांचा पाठिंबा दर्शविला आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने वृत्त दिले की खान यांच्या पक्षाने प्रत्येक व्यासपीठावर नवीन सरकारला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेवरून हटवले जाणारे खान हे पहिले पंतप्रधान होण्याची शक्यता आहे, असे वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याचा दिलेला सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला आहे. न्यायालयाने नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांना (स्पीकर) अविश्वास प्रस्तावावर 9 एप्रिल रोजी (स्थानिक वेळेनुसार) सकाळी 10 वाजता मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास नवा पंतप्रधान निवडला जावा, असे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.