जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 'ते प्रत्येक पाकिस्तानीला दहशतवादी...'; भारत दौऱ्याहून परतताच पाकिस्तानी नेत्याने ओकलं विष

'ते प्रत्येक पाकिस्तानीला दहशतवादी...'; भारत दौऱ्याहून परतताच पाकिस्तानी नेत्याने ओकलं विष

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी

भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भारतीय मंत्री भाजपच्या भावनेचं प्रतिनिधित्व करत आहेत. जे मुस्लिमांच्या विरोधात धोरणांना प्रोत्साहन देतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 06 मे : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी शुक्रवारी (5 मे) गोव्याहून आपल्या देशात परतल्यानंतर भारताविरोधात विष ओकलं आहे. भारताच्या टीकेमागे स्वत:ची असुरक्षिततेची भावना असल्याचं ते म्हणाले. भाजप प्रत्येक मुस्लिमाला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, असं ते म्हणाले. बिलावल भुट्टो SCO च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होण्यासाठी गुरुवारी (4 मे) भारतात पोहोचले होते. ते म्हणाले की, सदस्य देशांसमोर काश्मीरबाबत तत्वतः भूमिका मांडण्यात आली होती. काश्मीरबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. भुट्टो म्हणाले की, भारताच्या भूमीवर बसून त्यांनी काश्मीरची वकिली केली. जोपर्यंत भारत आपला एकतर्फी निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हे प्रकरण पुढे जाणार नाही. नरेंद्र मोदींना गुजरातचा कसाई म्हणणारा पाकिस्तानी नेता येणार भारत दौऱ्यावर, काय आहे कारण परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं, की पाकिस्तानचं हे प्रकरण सदस्य देशांसमोर ठेवलं. भाजप आणि आरएसएसच्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याकांना समान अधिकार आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदू समाजातील लोक MNA आणि MPA बनतात. बिलावल भुट्टो म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात दिलेले बलिदान जगाला सांगितले पाहिजे. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भारतीय मंत्री भाजपच्या भावनेचं प्रतिनिधित्व करत आहेत . जे मुस्लिमांच्या विरोधात धोरणांना प्रोत्साहन देतात. भारतीय सत्ताधारी पक्ष आणि आरएसएस मला आणि प्रत्येक पाकिस्तानीला ‘दहशतवादी’ घोषित करू इच्छितात, असंही ते म्हणाले. द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या गरजेचा संदर्भ देत ते म्हणाले की, जोपर्यंत भारत काश्मीरबाबत आपली भूमिका बदलत नाही (कलम ३७०-ए स्वीकारत नाही) तोपर्यंत कोणतीही अर्थपूर्ण चर्चा होऊ शकत नाही. बिलावल भुट्टो यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले होते की, जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्येही G-20 च्या बैठका होत आहेत, यात काही असामान्य नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात