Home /News /videsh /

चोरांपासून रक्षणासाठी त्याने लावली कॅमेरावाली डोअर बेल, पडला 1 कोटींचा भुर्दंड

चोरांपासून रक्षणासाठी त्याने लावली कॅमेरावाली डोअर बेल, पडला 1 कोटींचा भुर्दंड

आपल्या दारात सीसीटीव्ही असलेली डोअर बेल Court fines a person for planting CCTV door bell लावण्याचा मोठा भुर्दंड एका व्यक्तीला भरावा लागला आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर : चोरांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने (Court fines a person for planting CCTV door bell) त्याच्या दरवाजात कॅमेरा असणारी बेल लावली. दारात कुणीही आलं आणि त्यानं बेल दाबली की कॅमेरात त्या व्यक्तीचा चेहरा दिसावा, हा त्यामागचा उद्देश होता. आपल्या घरात येणाऱ्या संभाव्य चोरांपासून (To protect house from thieves) संरक्षण करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करतो, तसाच उपाय या व्यक्तीनेही केला. मात्र त्याचा आपल्याला 1 कोटींचा भुर्दंड बसेल, याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. चोरीनंतर लावली डोअरबेल डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार जॉन वुडार्डच्या घरी काही महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. त्यानंतर आपल्या घराचं संरक्षण वाढवण्याचा निर्णय त्याने घेतला आणि एक सीसीटीव्ही असणारी डोअरबेल खरेदी केली. आपण घरी नसताना जरी एखादी आगंतुक व्यक्ती आली, तरी त्याचा चेहरा या कॅमेऱ्यात कैद होईल आणि आपल्याला चोराचा पत्ता लागेल, हा त्यामागचा हेतू. मात्र चोरापासून संरक्षण करता करता कायदाच आपल्या खिशाला चुना लावेल, याची त्याला बिलकूल कल्पना नव्हती. हे वाचा - महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सावरकरांनी केलेली दया याचिका : राजनाथ सिंह कायद्यामुळे पडला भुर्दंड जॉनच्या घरी चोरी झाल्यामुळे त्याने स्वतः हा कॅमेरा डेव्हलप केला. यात कॅमेऱ्यासोबत मायक्रोफोनही होता. त्यामुळे दरवाजात आलेली व्यक्ती काय बोलते, हेदेखील रेकॉर्ड होत होतं. याला जॉनच्या शेजारणीने आक्षेप घेतला. आपल्या दारात हा कॅमेरा आणि मायक्रोफोन बसवल्यामुळे आपल्या खासगी आय़ुष्यावर अतिक्रमण होत असल्याचा दावा तिने न्यायालयात केला. न्यायालयाने हा दावा मान्य करत जॉनला शिक्षा ठोठावली. जॉनला 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. खासगी डेटा कायद्याचं उल्लंघन झाल्याचा ठपका जॉनवर ठेवण्यात आला असून त्याचा भुर्दंड भरावा लागणार आहे. कायद्याचं ज्ञान नसल्याचा मोठा फटका जॉनला बसला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Cctv, Court, Theft

    पुढील बातम्या