इस्लामाबाद, 5 ऑगस्ट : पाकिस्तानात कट्टरपंथियांनी हिंदुंच्या मंदिराची तोडफोड केली आहे. पाकिस्तानी सोशल मीडिया युजर्सनुसार, ही घटना पंजाब प्रांतातील भोंग शहरातील असल्याचं बोललं जात आहे. बुधवारी संध्याकाळी गणपती मंदिरात काही समाजकंटकांकडून ही तोडफोड करण्यात आली.
पंजाब प्रांतातील भोंग शहरात असलेल्या गणपती मंदिरात समाजकंटकांनी ही तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील मूर्तीसह इतरही वस्तूंची नासधूस केली आहे. मंदिरात लावलेले झुंबर, काचेच्या सजावटीच्या सामानाची तोडफोड करण्यात आली आहे.
You are free to go you temple? Watch this brazen attack on a temple in the broad daylight.
Another bad day for #Hindus as Ganesh #Temple in Bhong city of Rahimyar Khan was attacked by miscreants. The beasts daringly live telecast the attack on Facebook: https://t.co/uVq8UYBkQB pic.twitter.com/SzGrtIxEzk — Kapil Dev (@KDSindhi) August 4, 2021
Trigger Warning : Violence
A Hindu Temple Attacked and Vandalized in Bhong City Dist Rahimyar Khan, Punjab, Pakistan. pic.twitter.com/VUoowc7ohh — Rashmi Samant 🌺 (@RashmiDVS) August 4, 2021
यावेळी मंदिर परिसरात समाजकंटकांची मोठी गर्दी होती. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. व्हिडीओमध्ये अनेक जण हातात काठ्या घेऊन मंदिराच्या आत तोडफोड करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात झाला आहे. या घटनेनंतर परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने या घटनेची दखल घेतली असून मंदिरातील तोडफोड प्रकरणी दोषींवर कारवाईचे आदेशही दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan