Oxford Vaccine Group साठी काम करणाऱ्या Jenner Institute ची लस शास्त्रज्ञ प्रा. सारा गिल्बर्ट यांचं नाव आता जगभरात Coronavirus वर विजय मिळवणारी सुपरवुमन म्हणून घेतलं जाऊ लागलं आहे.
Coronavirus वर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेल्या लशीने(covid vaccine)अवघ्या जगाला दिलासा दिला आहे. लशीच्या चाचणीचे रिपोर्ट सकारात्मक आले आहे.
सारा गिल्बर्ट या ऑक्सफर्डमधल्या 250 संशोधकांच्या टीमचं नेतृत्व करत आहेत. सारा यांनी यापूर्वी इबोला विषाणूवर लस शोधून असा चमत्कार पूर्वीसुद्धा करून दाखवला आहे.
इंग्लंडमध्येच वाढलेल्या सारा गिल्बर्ट यांना तीन 21 वर्षांची मुलं आहेत. तिळ्यांना सांभाळताना करिअर पणाला लावलं होतं, असं त्या सांगतात.
पोस्ट डॉक्टरल स्कॉलर म्हणून मला मिळणाऱ्या पगारापेक्षा तेव्हा माझ्या मुलांची नर्सरी फी जास्त होती. शेवटी माझ्या नवऱ्याने नोकरी सोडून मुलांसाठी घरी राहण्याचा निर्णय घेतला, असं सारा यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
चिनी संशोधकांनी 10 जानेवारीला Covid-19 विषाणूच जनुकीय संशोधन जाहीर केलं त्या दिवसापासून सारा विषाणूवर विजय मिळवण्यासाठी लस निर्मितीच्या मागे आहेत.
आपल्या 21 वर्षांच्यी तीन मुलांवरच त्यांनी कोविड लशीची पहिली चाचणी केली. आपल्या यशाची खात्री असल्याने या स्त्रीने मुलांवरच चाचणी करण्याचा धोका पत्करला.
दररोज सकाळी 4 वाजता सारा यांचा दिवस सुरू होतो तो अनेक तास लॅबमध्येच जातो. पांढऱ्या कोटमधला सुपरमॅन असं त्यांचं वर्णन ब्रिटीश माध्यमांनी केलं आहे.